मुंबई, 17 नोव्हेंबर: आयपीएल 2023 साठीची रिटेन्शन विंडो मंगळवारी बंद झाली. आयपीएलमधल्या दहाही फ्रँचायझींनी आपापले रिटेन खेळाडू आणि रिलीज खेळाडू यांची यादी जाहीर केली. याचदरम्यान रिटेन केलेल्या खेळाडूंनी सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे. राजस्थान आणि चेन्नई रिटेन केलेले तीन युवा खेळाडू तर या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहेत. यशस्वी-परागची शतकं संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सनं यंदा युवा खेळाडूंवर चांगलाच विश्वास दाखवला. हे दोन युवा खेळाडू आहेत मुंबईचा यशस्वी जैसवाल आणि आसामचा रायन पराग. गेले अनेक सीझन हे दोघे युवा खेळाडून राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात आहेत. मंगळवारी या दोघांनाही राजस्थाननं टीममध्ये कायम ठेवलं आणि आज दोनच दिवसांनी त्या दोघांनीही विजय हजारे ट्रॉफीत शतकं ठोकली. यशस्वी जैसवालनं यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीतलं पहिलं शतक झळकावताना महाराष्ट्राविरुद्ध 142 धावांची खेळी केली. तर रायन परागनं सिक्कीमविरुद्ध 128 धावा ठोकल्या. या दोघांच्या कामगिरीचं राजस्थान फ्रँचायझीचं कौतुक केलं आहे.
Same beast. New best! 💯 pic.twitter.com/cZDNjPAfhm
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 17, 2022
राहुल त्रिपाठीची वादळी खेळी दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादच्या राहुल त्रिपाठीनं महाराष्ट्राकडून खेळताना 156 धावांची खेळी केली. त्याच्या याच खेळीमुळे महाराष्ट्रानं मुंबईला 21 धावांनी हरवून विजय हजारे ट्रॉफीत आणखी एका विजयाची नोंद केली. राहुल त्रिपाठीला गेल्या सीझनमध्ये हैदराबादनं फारशी संधी दिली नव्हती. पण त्याच्यातली गुणवत्ता पाहून त्याला संघात रिटेन करण्यात आलं आहे. राहुल त्रिपाठीचा सहकारी आणि चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज त्रिपाठीनंही या स्पर्धेत धावांची बरसात केली आहे.
Mana Riser ℝ𝕒'ℍ𝕌𝕃𝕂' 𝕋𝕣𝕚𝕡𝕒𝕥𝕙𝕚 warming up for the 🇧🇩 tour in style💪
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 17, 2022
Helps Maharashtra post 342/2 in the Maha Derby 🔥#MAHvMUM #VijayHazareTrophy #OrangeArmy pic.twitter.com/v7CAYmzxCa
हेही वाचा - Ind vs NZ: ‘ती’ जात होती पंड्याकडे, ‘तिला’ पकडलं विल्यम्सननं… पहिल्या टी20 आधी हे काय घडलं? Video युवा खेळाडूंच्या परफॉर्मन्सनं फ्रँचायझी खुश दरम्यान विजय हजारे ट्रॉफीतल्या परफॉर्मन्सकडे सध्या अनेक फ्रँचायझी लक्ष ठेवून आहेत. रिटेन केलेल्या खेळाडूंच्या कामगिरीचं फ्रँचायझींकडून कौतुक होतंय. तर देशातल्या इतर युवा खेळाडूंचा परफॉर्मन्सकडेही त्यांची खास नजर राहील. कारण 23 डिसेंबरला आयपीएलच्या आगामी सीझनसाठी लिलाव होणार आहे.