महेंद्रसिंग धोनी
+मुंबई, 25 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आज एक मोठी घोषणा करणार असल्याचं काल जाहीर केलं होतं. त्यामुळे अख्ख्या देशात आता धोनी आणखी काय मोठा निर्णय घेणार याची उत्सुकता होती. कदाचित धोनी आयपीएलमधूनही रिटायर्ड होतोय की काय? असं अनेकांना वाटलं. पण प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही. धोनीनं लाईव्ह येत 2011 साली लॉन्च केलेल्या एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग केलं. पण ते करताना त्यानं एक कारणही सांगितलं. धोनीकडून ओरिओ कूकीजचं रिलॉन्चिंग धोनीनं आज ओरिओ या कूकीजचं रिलॉन्चिंग केलं. पण 2011 सालीच या कंपनीनं आपलं प्रॉडक्ट बाजारात आणलं होतं. पण आता रिलॉन्चिंग करण्याचं कारण धोनीनं सर्वांना दिलं. 2011 साली ओरिओ कूकीज लॉन्च झाली आणि भारतानं त्याच वर्षी वर्ल्ड कप जिंकला. आणि यंदा पुन्हा आपण वर्ल्ड कप खेळणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा या कूकीजचं आपण रिलॉन्च केल्याचं धोनीनं म्हटलंय. आणि त्यामागचं कनेक्शन समजून घ्या असंही धोनी म्हणाला.
सोशल मीडियात कालपासून चर्चा धोनीनं काल संध्याकाळी फेसबुक पोस्ट केली होती. ही पोस्ट सोशल मीडियात इतकी व्हायरल झाली की धोनीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. खरं तर धोनी सोशल मीडियात इतर सेलिब्रेटिंप्रमाणे फारसा अॅक्टिव्ह नसतो. पण काल त्यानं फेसबुकवर पोस्ट टाकताच धोनी त्याच्या कारकीर्दीसंदर्भात कोणता तरी मोठा निर्णय घेणार असं अनेकांना वाटलं. सगळीकडे बातम्या पसरल्या. पण प्रत्यक्षात धोनीनं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग करत त्याचं कनेक्शन आगामी टी20 वर्ल्ड कपशीही जोडलं.
हेही वाचा - Cricket Laws: नियम बदलला तरी त्याच नियमावरुन पुन्हा राडा… भारताच्या विजयानंतर नवी कॉन्ट्रोवर्सी अचानकपणे घेतला होता क्रिकेटमधून संन्यास 15 ऑगस्ट 2020 ही तारीख भारतातल्या प्रत्येक क्रिकेटरसिकाला आठवत असेल. याच दिवशी संध्याकाळी बरोबर 7.29 वाजता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. त्यामुळे धोनी आजही तसाच काही निर्णय घेणार का असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षात अशा प्रकारे एका प्रॉडक्टचं लॉन्चिंग करुन धोनीनं सगळ्यांनाच धक्का दिला. पण अनेकांनी धोनी रिटायर्ड होत नाहीय हे ऐकून निश्वास सोडला.