JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कोचने बक्षीसाची अर्धी रक्कम न दिल्याने हरवलं, आत्महत्येशिवाय पर्याय नाही, राष्ट्रीय प्लेअरची व्यथा

कोचने बक्षीसाची अर्धी रक्कम न दिल्याने हरवलं, आत्महत्येशिवाय पर्याय नाही, राष्ट्रीय प्लेअरची व्यथा

खेलो इंडियात ५ लाख रुपयांची प्राइज मनी आहे. जर मुलगी जिंकली तर त्यातली अर्धी रक्कम हवी असं आईला फोन करून प्रशिक्षकांनी सांगितल्याचा आरोप राष्ट्रीय प्लेअरने केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 26 डिसेंबर : राष्ट्रीय खेळाडू असलेल्या दीपशिखा हिने तिच्या दोन प्रशिक्षकांवर गंभीर असे आरोप केले आहेत. मल्लखांब खेळाडू असणाऱ्या दीपशिखाने आरोप केला की, खेलो इंडियाच्या बक्षीसातील अर्धी रक्कम प्रशिक्षकांनी मागितली. जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा मला हरवलं. कारण सामन्याचे रेफ्री माझे प्रशिक्षकच होते. खेळून जेव्हा परत आले तेव्हा मी इतकी त्रासले की खेळणंच सोडून दिलं. 5 महिन्यांपासून सराव केला नाही. मला कॉलेजच्या टीममध्येही निवडलं नाही असा आरोप दीपशिखाने केला आहे. तिने या आरोपांचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, प्रशिक्षकांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. दीपशिखा गेल्या १० वर्षांपासून मल्लखांब खेळत आहे. गेल्या सहा वर्षांपासून तिने प्रशिक्षक रवी परिहार आणि अनिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. दीपशिखाने व्हिडीओमधून असा आरोप केला की, हरयाणातील पंचकुला इथं आय़ोजित केलेल्या खेलो इंडियासाठी ४ जून रोजी संघ जाणार होता. यामध्ये मलाही निवडण्यात आलं होतं. पण यानंतर प्रशिक्षकांनी आईला फोन करून विजेतेपदाच्या रकमेच्या अर्धी रक्कम मागितली. हेही वाचा :  IPL 2023च्या आयोजनात ICCच्या नियमाचा अडथळा, BCCIसमोर तयारीचा पेच खेलो इंडियात ५ लाख रुपयांची प्राइज मनी आहे. जर मुलगी जिंकली तर त्यातली अर्धी रक्कम हवी असं आईला फोन करून प्रशिक्षकांनी सांगितल्याचा आरोप दीपशिखाने केला. यावर आईने प्रशिक्षकांना उत्तर दिलं होतं की," मुलीचे कष्ट आहेत आणि तुम्हाला पैसे का देऊ?" यानंतर मला खेळण्यासाठी ते घेऊन गेले पण माझ्या खेळाचे योग्य मूल्यमापन केले नाही आणि मला हरवण्यात आलं. तिथे माझे प्रशिक्षकच रेफरी होते असंही दीपशिखाने म्हटलं. दीपशिखाने म्हटलं की, पंचकुलाहून परतल्यानंतर मी १० ते १५ दिवसांनी सरावाला गेले. पण पुन्हा सराव बंद केला. २२ ऑगस्ट २०२२ रोजी नॅशनलसाठी ट्रायल झाली. माझा सराव बंद होता पण मी ट्रायल दिली. तिथेही निर्णय प्रशिक्षकांच्याच हातात होता. माझी निवड केली नाही आणि माझ्याबद्दल चुकीचे बोलण्यात आल्याचं दीपशिखा म्हणाली. हेही वाचा :  मुंबई इंडियन्सने घेतलेल्या गोलंदाजाचा बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पंच आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतही निवड न झाल्यानं मी पूर्णपणे खचून गेले. प्रशिक्षक इतका मानसिक त्रास देतात की जर एखाद्याला सहन झालं नाही तर ती व्यक्ती गळफास घेईल. माझ्यासोबतही हेच झालं. मी आत्महत्या करायला निघाले होते पण माहिती नाही काय झालं, मी रात्री ३ तास उशिरा घरी पोहोचले. माझे मेडल्स आणि इतर पुरस्कार मोडून टाकले आणि पुढच्याच दिवशी व्हिडीओ केला असं दीपशिखाने म्हटलं आहे. दीपशिखाने केलेल्या आरोपावर प्रशिक्षक रवि परिहार यांनी म्हटलं की,“तिने जे आरोप केलेत ते सर्व बिनबुडाचे आहेत. माझ्यासाठी सर्व खेळाडू एकसारखेच आहेत. मी कोणासोबतही भेदभाव केलेला नाही.” या प्रकरणी उत्तर प्रदेश मल्लखांब असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष संजीव सरावगी यांनी आता माहिती मिळाल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून याबाबत मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाला कळवण्यात येईल असंही म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या