मेलबर्न, 26 डिसेंबर : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात आटोपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 1 बाद 45 धावा केल्या आहेत. 100वी कसोटी खेळणारा डेव्हिड वॉर्नर 32 आणि मार्नस लाबुशेन 5 धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात मार्को जॉन्सनने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर यष्टीरक्षक फलंदाज काइल वेरेन्नेने 52 धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र फारशा धावा करता आल्या नाहीत. कर्णधार डीन एगरने 26 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. संघाने 67 धावात 5 विकेट गमावल्या होत्या. हेही वाचा : स्कॅमपासून सावध रहा, माझी पत्नी…; लग्नानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून संघात घेतलेल्या कॅमरून ग्रीनने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर मिशेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या. याशिवाय स्कॉट बोलँड आणि नाथन लियोन यांना प्रत्येकी एक एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 6 गडी राखून जिंकला होता. मालिकेतील अखेरचा सामना 4 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हेही वाचा : भारत क्रिकेट खेळत नसता तर… ; अश्विनने श्रीलंकेच्या चाहत्याला सुनावलं दक्षिण आफ्रिकेची अवस्था 5 बाद 67 अशी झाली होती. तेव्हा काइल वेरेन्ने आणि मार्को जॉन्सन यांनी संघाची धावसंख्या 150 च्या वर पोहोचवली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 112 धावांची भागिदारी केली. यात काइलने 85 चेंडूत 48 धावा तर जॉन्सनने 134 चेंडूत 58 धावा केल्या. यानंतर इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.