JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कोट्यवधींची आलिशान कार, सरप्राइज पाहताच झाला अवाक्

VIDEO : रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कोट्यवधींची आलिशान कार, सरप्राइज पाहताच झाला अवाक्

जॉर्जिना रोड्रिग्जने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने रोनाल्डोला रोल्स रॉयस डॉन कनव्हर्टिबल कार गिफ्ट देऊन सरप्राइज दिलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27  डिसेंबर : जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ख्रिसमसनिमित्त एकमेकांना भेटवस्तूही दिल्या जातायत. पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोला त्याची पार्टनर जॉर्जिना रोड्रिग्जने त्याला खास भेट दिली. रोड्रिग्जने रोनाल्डोला रोल्स रॉयसची जवळपास 3 कोटी रुपये किंमत असलेली कार सरप्राइज गिफ्ट दिली. जॉर्जिना रोड्रिग्जने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने रोनाल्डोला रोल्स रॉयस डॉन कनव्हर्टिबल कार गिफ्ट देऊन सरप्राइज दिलं. रोनाल्डोला जेव्हा कार गिफ्ट मिळाली तेव्हा तो अवाक् झाला होता.

संबंधित बातम्या

व्हिडीओमध्ये रोनाल्डो मुलांसोबत घराच्या बाहेर जाताना दिसतो. तेव्हा बाहेर आल्यावर अचानक समोर एक कार दिसते आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज ही रोनाल्डोला सरप्राइज गिफ्टबद्दल सांगते. हेही वाचा :  VIDEO : द्विशतकाचं सेलिब्रेशन वॉर्नरला पडलं महागात, पुढे एकही चेंडू न खेळता सोडलं मैदान रोनाल्डो यानंतर रॉड्रिग्ज आणि मुलांसह कारमधून फेरफटका मारताना दिसतो. रोनाल्डोने त्याच्या इन्स्टाग्रामवर रॉड्रिग्जचे या खास गिफ्टसाठी आभारही मानले आहेत. आता सोशल मीडियावर कारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रॉड्रिग्जने मुलांसाठीही काही गिफ्ट्स दिली आहेत. यात लहान मुलींना सायकलींची भेट दिलीय. तर इतरांनाही भेटवस्तू दिल्या आहेत. मँचेस्टर युनायटेडनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरबच्या अल नसरमध्ये गेला असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोने प्रत्येक हंगामासाठी 200 मिलियन युरोचा करार केला असल्याचं स्पॅनिश मीडियाने वृत्त दिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या