मेलबर्न, २७ डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत द्विशतक केलं. त्याने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वादळी खेळी केली. वॉर्नरने 254 चेंडू खेळताना 200 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. वॉर्नरने द्विशतक केलं पण त्यानंतर एकही चेंडू तो खेळू शकला नाही. रिटायर्ड हर्ट होऊन त्याला मैदान सोडावं लागलं. द्विशतकाचं सेलिब्रेशन करणं वॉर्नरला महागात पडलं. वॉर्नर द्विशतकाच्या जवळ असताना त्याला क्रँम्पमुळे चालताना थोडा त्रास होत होता. पण द्विशतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरने देहभान विसरून जल्लोष केला. यावेळी उत्साहाच्या भरात त्याने उंच उडी मारल्यानंतर पायावर दाब पडला आणि पुन्हा वेदना सुरू झाल्या. यामुळे तो पुढे एकही चेंडू खेळू शकला नाही आणि मैदानातून बाहेर गेला.
A double century for David Warner!
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2022
But his #OhWhatAFeeling jump comes at a cost! 😬#AUSvSA | @Toyota_Aus pic.twitter.com/RqJLcQpWHa
हेही वाचा : बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नरचं वादळ, द्विशतक झळकावत केले अनेक विक्रम वॉर्नरने तीन वर्षानंतर कसोटीमध्ये मोठी खेळी केली आहे. याआधी जानेवारी 2020 मध्ये शतक केलं होतं. बॉक्सिंग डे कसोटी वॉर्नरची 100 वी कसोटी आहे. या सामन्यात शतक करून त्याने अनेक विक्रम केले आहेत. 100 व्या कसोटीत आणि 100 व्या एकदिवसीय सामन्यात शतक करणारा वॉर्नर हा जगातला केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून 100 व्या कसोटीत शतक करणारा तो रिकी पॉटिंगनंतर पहिलाच फलंदाज आहे.