जाडेजाऐवजी रोहित शर्माच्या संघात कुणाला संधी
मुंबई, 11 सप्टेंबर**:** आशिया चषकातलं अपयश विसरुन टीम इंडिया आता आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे. दुबईतल्या आशिया चषकात भारतीय संघाला सुपर फोर फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेत भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरली. अनुभवी गोलंदाजांची कमी आशिया चषकात भारतीय संघाला चांगलीच जाणवली. पण आता आनंदाची बाब ही की जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल आता फिट झाले आहेत आणि पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. मात्र दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या जाडेजाच्या जागी कोण हा मोठा प्रश्न रोहित शर्मा आणि भारतीय संघव्यवस्थापनासमोर असणार आहे. शस्त्रक्रियेमुळे जाडेजा विश्वचषकाला मुकणार आशिया चषकात हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून सावरण्यासाठी जाडेजाला किमान तीन महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयची निवड समिती ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये जाडेजाच्या जागी कुणाला संधी देणार याची उत्सुकता आहे.
अक्षर पटेल जाडेजाची जागा घेणार**?** आशिया चषकात जाडेजाला दुखापत झाली तेव्हा अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपसाठीही अक्षर पटेल हाच जाडेजासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. अक्षर पटेलनं गेल्या काही मालिकांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे अक्षर पटेलचा विश्वचषक संघात समावेश होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. पटेलनं आतापर्यंत 26 टी20 सामन्यात 21 विकेट्स आणि 147 धावा अशी कामगिरी केली आहे. हेही वाचा - Asia Cup 2022: आशियाचा किंग कोण? पाकिस्तान-श्रीलंका संघात आज मेगा फायनल, कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI? विश्वचषकासाठी लवकरच संघनिवड 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसह अनेक देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. त्यामुळे लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची निवड समिती 15 किंवा 16 सप्टेंबर रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा करेल अशी माहिती आहे.