मुंबई, 21 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. स्पर्धेतील क्वॉलिफायर राउंड पूर्ण झाला असून, त्यामुळे पुढील फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे उर्वरित स्पर्धाही रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसनने एका भारतीय खेळाडूबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाने 15 वर्षांपूर्वी टी-20 वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं 2007 साली फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. या वेळी भारतीय टीम रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध भारत आपली स्पर्धेतील पहिली मॅच खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर शेन वॉटसनने टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्याची प्रशंसा केली आहे. काय म्हणाला वॉटसन? शेन वॉटसननं टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “हार्दिक एक प्रतिभावान क्रिकेटर आहे. तो ज्या प्रकारे 140 किलोमीटर प्रतितास वेगाने बॉलिंग करतो, ते विलक्षण आहे. त्याच्याकडे केवळ उत्कृष्ट कौशल्यच नाही तर विकेट घेण्याची आणि रनचा बचाव करण्याची उत्तम क्षमतादेखील आहे.” वेस्ट इंडिजवर आली बॅग भरण्याची वेळ… टी20 वर्ल्ड कप इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच घडलं! हार्दिक सध्या चांगली कामगिरी करत आहे. तो पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं या वर्षी (2022) आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. आयपीएलचा 15वा सिझन संपल्यानंतर हार्दिकने टीम इंडियासाठीदेखील चांगली कामगिरी केली आहे. उत्तम फिनिशर! शेन वॉटसनच्या म्हणण्यानुसार, ‘त्याचा (हार्दिक पंड्या) बॅटिंग फॉर्मही सध्या चांगला आहे. तो केवळ फिनिशरच नाही तर पॉवर हिटरही आहे. त्याच्याकडे सर्व कौशल्यं आहेत. गेल्या आयपीएलमध्ये आपण सर्वांनी हे पाहिले आहे. तो एकटाच टी- 20 वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो. तो खऱ्या अर्थाने मॅच विनर खेळाडू आहे.’ T20 WC : वर्ल्ड कप जिंकला नाही तर… गावसकरांनी दिली टीम इंडियाला तंबी
टीम इंडियाने 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियात पाऊल ठेवलं आहे. यानंतर दोन प्रॅक्टिस आणि दोन वॉर्म-अप मॅचेस खेळल्या आहेत. 23 ऑक्टोबर रोजी टीम मुख्य स्पर्धेतील पहिली मॅच खेळणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध ही लढत रंगेल. दोन्ही देशांचे फॅन्स या मॅचची आतुरतेने वाट बघत आहेत. शनिवारपासून (22 ऑक्टोबर) टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर-12 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत.