JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : लखनऊनं केली 'गंभीर' चूक, राहुलच्या एका निर्णयामुळे टीम पराभूत

IPL 2022 : लखनऊनं केली 'गंभीर' चूक, राहुलच्या एका निर्णयामुळे टीम पराभूत

आयपीएल स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RR vs LSG) फक्त 3 रननं पराभव केला. कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) यानं केलेली गंभीर चूक टीमच्या पराभवाचं कारण ठरली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च : आयपीएल स्पर्धेत रविवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RR vs LSG) फक्त 3 रननं पराभव केला. या मॅचमध्ये लखनऊ समोर विजयासाठी 166 रनचं आव्हान होतं. त्यांनी 8 आऊट 162 रन केले.  लखनऊला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 15 रनची गरज होती. कुलदीप सेनने मात्र या ओव्हरमध्ये 11 रन देत राजस्थानला विजयी केलं. लखनऊचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) यानं केलेली गंभीर चूक टीमच्या पराभवाचं कारण ठरली. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) 17 बॉलमध्ये 38 रनवर नाबाद राहिला, त्याने 2 फोर आणि 4 सिक्स मारले. स्टॉयनिसच्या फटकेबाजीमुळेच विजय लखनऊच्या आवाक्यात आला होता. राहुलने याच स्टॉयनिसच्या बाबतीत चूक करत त्याला आठव्या क्रमांकार बॅटींगसाठी पाठवले. त्यामुळे त्याला बॉल कमी खेळायला मिळाले. स्टॉयनिस हा लखनऊचा प्रमुख खेळाडू आहे. त्याला लखनऊनं आयपीएल ऑक्शनपूर्वीच ड्राफ्टमध्येच करारबद्ध केलं होतं. टी20 क्रिकेटमध्ये त्याला ओपनिंग करण्याचाही अनुभव आहे. अगदी आयपीएल फायनलमध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्सकडून ओपनिंग केली आहे.  पाकिस्तान विरूद्धच्या सीरिजमुळे स्टॉयनिस उशीरा लखनऊच्या टीममध्ये दाखल झाली. रविवारी त्याची पहिली मॅच होती. प्रमुख खेळाडूला जास्त बॉल खेळण्याची संधी देण्यापेक्षा राहुलनं त्याला सर्वात उशीरा बॅटींगसाठी पाठवलं. तो टीमकडून मैदानात उतरलेला सर्वात शेवटचा बॅटर होता. स्टॉयनिसनं उशीरा येऊनही केलेला खेळ पाहाता त्याला आणखी काही बॉल मिळाले असते तर लखनऊनं मॅच नक्की जिंकली असती, असं मत व्यक्त केलं जात आहे. Explained : IPL मध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलेला Retired Out नियम काय आहे? राहुलनं केला बचाव लखनऊचा कॅप्टन केएल राहुलनं मॅच संपल्यानंतर बोलताना स्टॉयनिसला उशीरा बॅटींगला पाठवण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे. ‘स्टॉयनिसला उशीरा पाठवण्याचा निर्णय यासाठी घेतला की आमच्याकडं अनेक बॅटींग करू शकणारे खेळाडू आहेत. आम्हाला ‘त्या’ परिस्थितीमधून बाहेर पडायचं होतं,’ असं राहुलनं मॅचनंतर सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या