मुंबई, 7 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील एक थरारक सामना शुक्रवारी झाला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सचा (MI vs GT) 5 रननं पराभव केला. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 9 रन हवे होते. मुंबईचा फास्ट बॉलर डॅनियल सॅम्सनं हे होऊ दिलं नाही. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिले. मुंबई इंडियन्सनं मॅच जिंकताच कॅप्टन रोहित शर्मासह (Rohit Sharma) मुंबईचे सर्व खेळाडू आनंदी झाले होते. त्यांनी या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केले. फक्त मैदानातच नाही तर स्टेडिअममध्येही या मॅचचं टेन्शन वाढलं होतं. प्रत्येक बॉलनंतर दोन्ही टीमच्या फॅन्सचे चेहरे बदलत होते. डॅनियल सॅम्सच्या शेवटच्या बॉलवर डेव्हिड मिलरला सिक्स मारता आला नाही. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या पत्नींनी विजयाचा जल्लोष साजरा केला. तर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या पत्नींना निकालावर विश्वास बसत नव्हता. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा (Natasa Stankovic) आणि रोहितची पत्नी रितिका (Ritika Sajdeh) यांची प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.
या स्पर्धेत टार्गेटचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनं चांगली कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्सनं दिलेल्या 178 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना गुजरातनं चांगली सुरूवात केली होती. शुभमन गिल आणि वृद्धीमान जोडीनं पहिल्या विकेटसाठी 106 रनची भागिदारी केली. त्यावेळी गुजरात हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण, मुंबई इंडियन्सनं आशा न सोडता मॅच खेचून आणली. IPL 2022 : 2 बॉलमध्ये बदलला मॅचचा निकाल, हार्दिक पांड्या ठरला पहिला गुन्हेगार गुजरातचा 11 सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे. तर मुंबई इंडियन्सचा 10 सामन्यांमधील हा दुसरा विजय आहे. या सिझनमध्ये पहिले आठ सामने सलग गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा पराभव करत मुंबईनं पराभवाची मालिका तोडली होती. त्यानंतर त्यांनी आता पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सचाही पराभव केला. मुंबईसाठी 21 बॉलमध्ये नाबाद 44 रनची खेळी करणाऱ्या टीम डेव्हिडला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.