JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : Live मॅचमध्ये हार्दिकनं लावला डोक्याला हात, Video Viral

IPL 2022 : Live मॅचमध्ये हार्दिकनं लावला डोक्याला हात, Video Viral

जरातनं मंगळवारी झालेल्या लढतीमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 62 रननं पराभव केला. या मॅचमध्ये गुजरातच्या बॉलर्सनी दमदार बॉलिंग केली. पण, कॅप्टन हार्दिक पांड्या बॅटनं फार कमाल करू शकला नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएल ‘प्ले ऑफ’ मध्ये दाखल झालेली पहिली टीम बनली आहे. गुजरातनं मंगळवारी झालेल्या लढतीमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 62 रननं पराभव केला. या मॅचमध्ये गुजरातच्या बॉलर्सनी दमदार बॉलिंग केली. पण, कॅप्टन हार्दिक पांड्या बॅटनं फार कमाल करू शकला नाही. तो फक्त 11 रन काढून आऊट झाला. पांड्या आऊट झाल्यानंतर काही वेळ त्याला विश्वास बसलाच नाही. आऊट झाल्यानंतर काही वेळ तो डोक्याला हात लावून बसला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लखनऊचा कॅप्टन केएल राहुलनं 10 व्या ओव्हरमध्ये आवेश खानकडं बॉल दिला होता. आवेशनं पहिल्याच बॉलवर हार्दिकला (11) आऊट केलं. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल जोरात मारण्याच्या नादात हार्दिकनं विकेट किपर क्विंटन डी कॉककडं कॅच दिला. त्यानंतर हार्दिक काही वेळ हॅल्मेट घालूनच पॅव्हिलियनमध्ये बसला होता.

संबंधित बातम्या

हार्दिक पांड्याने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 144 एवढा स्कोअर केला. शुभमन गिलने नाबाद 63, मिलरने 26 आणि राहुल तेवातियाने नाबाद 22 रनची खेळी केली. आवेश खानने सर्वाधिक 2 आणि मोहसीन खान, जेसन होल्डरला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. IPL 2022 : चर्चा तर होणारच! त्या प्रश्नावर गिलने घेतलं तेंडुलकरचं नाव! 145 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा 13.5 ओव्हरमध्ये फक्त 82 रनवर ऑल आऊट झाला. राशिद खानने (Rashid Khan) 3.5 ओव्हरमध्ये 24 रन देत 4 विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाळ आणि साई किशोर यांना 2-2 विकेट मिळाल्या. मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. लखनऊकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 रन केल्या तर 11व्या क्रमांकावर खेळणाऱ्या आवेश खानने 12 रन केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या