Home /News /sport /

IPL 2022 : चर्चा तर होणारच! त्या प्रश्नावर गिलने घेतलं तेंडुलकरचं नाव!

IPL 2022 : चर्चा तर होणारच! त्या प्रश्नावर गिलने घेतलं तेंडुलकरचं नाव!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) ओपनर शुभमन गिलने (Shubhaman Gill) आणखी एक अर्धशतक झळकावलं. लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या मॅचआधी गिलला एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) नाव घेतलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) ओपनर शुभमन गिलने (Shubhaman Gill) आणखी एक अर्धशतक झळकावलं. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गिलने लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध 49 बॉलमध्ये नाबाद 63 रनची खेळी केली, यात 7 फोरचा समावेश होता. गिलच्या या खेळीमुळे गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 144 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या लखनऊचा फक्त 82 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे गुजरातने हा सामना 62 रनने जिंकला. या विजयासोबतच गुजरात आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या मॅचआधी शुभमन गिलला क्रिकेटमध्ये त्याला सर्वाधिक प्रेरणा कोण देतं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना 22 वर्षांच्या शुभमन गिलने सचिन तेंडुलकरचं (Sachin Tendulkar) नाव घेतलं. सचिन तेंडुलकर निवृत्त होईपर्यंत तो मला खेळण्याची प्रेरणा देत होता, पण सचिनच्या निवृत्तीनंतर मी विराट कोहलीचा (Virat Kohli) फॅन आहे, असं गिल म्हणाला. 'मी मोठा होत होतो तेव्हा सगळ्यात जास्त प्रेरणा सचिन सरांकडूनच मिळाली. त्यांनी जेव्हा संन्यास घेतला आणि मला हा खेळ समजायला लागला, तेव्हापासून मी विराट भाईचा फॅन आहे,' असं वक्तव्य गिलने केलं. शुभमन गिलने आयपीएलच्या या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. या हंगामात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये गिल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 12 मॅचमध्ये 34.91 ची सरासरी आणि 137.14 च्या स्ट्राईक रेटने 384 रन केले आहेत, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 'मी या मोसमात चांगली सुरूवात केली होती, पण मधल्या सामन्यांमध्ये मला चांगलं करण्याची गरज होती. टी-20 क्रिकेटमध्ये असं होणं निश्चित आहे. तुम्ही काही शॉट माराल जे फिल्डरच्या हातात जातील. तसंच तुम्हाला काही वेळा दुर्भाग्यपूर्ण पद्धतीने आऊट व्हाल. मुंबईविरुद्धच्या सामन्यात मला थोडा फॉर्म परत मिळाला. हाच फॉर्म पुढे ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन,' असं उत्तर गिलने दिलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Sachin tendulkar

    पुढील बातम्या