मुंबई, 29 मे : आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या दोन टीम आमने-सामने आहेत. या दोन्ही टीमनं सातत्यपूर्ण खेळ करत फायनलममध्ये प्रवेश केला आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या टी20 लीग स्पर्धेचं विजेतेपद कोण पटकावणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणाऱ्या या फायनलपूर्वी खास कार्यक्रम होणार असून यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज हजेरी लावणार आहेत. यावर्षी साधारण 50 मिनिटे समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार ए.आर. रहमान, तसंच अभिनेता रणवीर सिंह सहभागी होणार आहेत. कोरिओग्राफर शामक दावरनं या कार्यक्रमाला दिग्दर्शित केलं आहे. संध्याकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमामुळे आयपीएल फायनलची वेळ देखील बदलण्यात आली आहे. आता फायनलचा टॉस संध्याकाळी 7.30 मिनिटांनी होईल. तर मॅच रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल स्पर्धेला समारोपाची परंपरा आहे. 2019 साली पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे यंदा तीन वर्षांनंतर हा कार्यक्रम होत आहे. चुरशीची फायनल गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) टीम यंदा पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) या टीमनं संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव करत फायनल गाठली आहे. IPL 2022 Final: KKR, DC, CSK ला जमलं नाही ते राजस्थान करणार का? संजूच्या टीमला इतिहास बदलण्याचं आव्हान राजस्थाननं शेन वॉर्नच्या कॅप्टनसीमध्ये 2008 साली आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. आता त्यांना तब्बल 14 वर्षांनी पुन्हा एकदा संधी आहे. तर गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या स्पर्धेतच विजेतेपद पटकावण्याचा इतिहास रचण्यासाठी आता फक्त एका विजयाची आवश्यकता आहे.