JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs BAN : टीम इंडियाला काय झालंय? पहिल्या टेस्टच्या हिरोलाच काढलं बाहेर

IND vs BAN : टीम इंडियाला काय झालंय? पहिल्या टेस्टच्या हिरोलाच काढलं बाहेर

IND vs BAN : दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियानं अतिशय धक्कादायक निर्णय घेतला आहे. चितगाव टेस्ट मॅचमधील विजयाचा हिरो असलेल्या खेळाडूलाच टीममधून वगळण्यात आलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर :  भारतीय क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. तीन मॅचेसची वन-डे सीरिज पार पडल्यानंतर आता दोन्ही टीम टेस्ट सीरिज खेळत आहेत. पहिली टेस्ट मॅच जिंकून दोन मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या मॅचमध्ये भारतानं बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला होता. दुसरी टेस्ट मॅच आजपासून (22 डिसेंबर) ढाका येथे खेळवली जात आहे. यजमान बांगलादेशनं टॉस जिंकून अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉसनंतर प्लेइंग इलेव्हन जाहीर झाली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियानं अतिशय धक्कादायक निर्णय घेतला आहे. चितगाव टेस्ट मॅचमधील विजयाचा हिरो असलेल्या कुलदीप यादवला आजच्या टेस्टमधून वगळण्यात आलं आहे.  कुलदीप यादवच्या जागी फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. चायनामन बॉलर कुलदीप यादवनं चितगाव टेस्ट मॅचमध्ये आठ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कारही त्याला देण्यात आला होता. काय दिलं कारण? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल म्हणाला, ‘आम्हाला अगोदर बॅटिंग करायची होती. पण, टॉस हारल्यामुळे ते शक्य नाही. आता फक्त चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे. विकेटमध्ये थोडासा ओलावा आहे त्यामुळे आम्ही झटपट विकेट घेतल्या पाहिजेत. टीममध्ये आम्ही एक बदल केला आहे. कुलदीपच्या जागी जयदेवचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीपला बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण आहे. पण, यामुळे जयदेव उनाडकटला संधी मिळत आहे.’ जमत नसेल तर केळी, अंडी विका; कपिल देव क्रिकेटपटूंवर भडकले अतिरिक्त स्पिन बॉलरची गरज असते तेव्हाच 28 वर्षांच्या कुलदीप यादवला संधी मिळते. आजच्या मॅचमध्येही आर. अश्विन आणि अक्षर पटेलला अगोदर संधी मिळाली. चितगाव टेस्टमध्ये 22 महिन्यांनंतर कुलदीप टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. कुलदीप यादवने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून पाच वर्षांत केवळ आठ मॅचेस खेळल्या आहेत. कुलदीपने या आठ टेस्ट मॅचमध्ये 34 विकेट्स घेतल्या आहेत. ही खूप प्रभावी कामगिरी म्हणता येईल. कुलदीप यादवनं भारतासाठी आठ टेस्ट, 73 वन-डे आणि 25 टी-20 इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यानं एकूण 197 विकेट्स घेतल्या आहेत. पाच वर्षात फक्त 8 कसोटीत संधी, कुलदीपचे 22 महिन्यांनी पुनरागमन अन् केला विक्रम दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया प्लेईंग-11: शुबमन गिल, केएल राहुल (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर. अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज. दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी बांगलादेश प्लेईंग-11: नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कॅप्टन), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, तस्किन अहमद.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या