JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL: टीम इंडियामध्ये हार्दिक राज! Video Viral होताच चर्चेला उधाण

IND vs SL: टीम इंडियामध्ये हार्दिक राज! Video Viral होताच चर्चेला उधाण

नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यापासून टीम इंडियात हार्दिक राज सुरू होण्याची चिन्ह आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर :  नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. जानेवारी (2023) महिन्यामध्ये दोन्ही टीममध्ये प्रत्येकी तीन मॅचेसची टी-20 आणि वन-डे सीरिज मालिका खेळवली जाणार आहे. मायदेशात असलेल्या या दोन्ही सीरिजसाठी स्टार स्पोर्ट्स अधिकृत प्रक्षेपक आहे. त्यामुळे रविवारी (25 डिसेंबर) स्टार स्पोर्ट्सनं सोशल मीडियावर भारतविरुद्ध श्रीलंका टी-20 सीरिजचा प्रोमो व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ हार्दिक पंड्यावर चित्रित करण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी पोस्टरमध्ये हार्दिक पंड्या आणि श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाका एकत्र दाखवण्यात आले आहेत. म्हणजेच स्टार स्पोर्ट्सनं हार्दिक पंड्याला टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून दाखवलं होतं. आपली चूक लक्षात येताच स्टार स्पोर्ट्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ काढून घेतला. मात्र, तोपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे  इन्स्टाग्रावर तो व्हिडीओ अजूनही कायम आहे. हार्दिक पंड्याला टॅग करत, स्टार स्पोर्ट्सनं लिहिलं होतं की, ‘आशियाई टी-20 इंटरनॅशनल चॅम्पियन्सविरुद्ध नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्यासाठी हार्दिक पंड्या सज्ज आहे. हार्दिक ‘राज’मधील या नव्या टीम इंडियासोबत  सज्ज व्हा.’ हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) अद्याप हार्दिक पंड्याला कॅप्टन केल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीदेखील अधिकृत प्रक्षेपकांनी व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्याला कॅप्टन म्हणून कसं दाखवलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी स्टार स्पोर्ट्सची चांगली खरडपट्टी काढली आहे. यानंतर स्टार स्पोर्ट्सनं ट्विटरवरून प्रोमो व्हिडिओ काढून टाकला आहे. भारत क्रिकेट खेळत नसता तर… ; अश्विनने श्रीलंकेच्या चाहत्याला सुनावलं हार्दिक का कॅप्टन होणार? अलीकडेच हार्दिक पंड्यानं न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय टी-20 टीमचं नेतृत्व केलं होतं. पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतानं किवी टीमविरुद्धची सीरिज 1-0 अशी जिंकली होती. तेव्हापासून पंड्याकडे टी-20 टीमचं कॅप्टनपद सोपवलं जाणार असल्याची चर्चा आहे. टी-20 टीमचं नेतृत्व रोहित शर्माऐवजी पंड्याकडे देण्यात यावं, असं फॅन्सचं म्हणणं आहे. रोहित या पुढे टी-20 टीमची कॅप्टन्सी करणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जागी हार्दिक पंड्या टीमची धुरा सांभाळेल.

संबंधित बातम्या

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं आपल्या पदार्पणाच्या आयपीएल सीझनचं विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएलपासूनच तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सीरिज 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. रोहित या टी-20 सीरिजमध्ये खेळणार नाही. रोहितच्या अंगठ्याला दुखापत झालेली आहे. त्यामुळे वन-डे सीरिजमध्येही त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना दिसू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या