मुंबई, 26 डिसेंबर : भारताने बांगलादेशला मीरपूर कसोटीत तीन गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात भारताची अवस्था 7 बाद 74अशी झाली होती. तेव्हा आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी नाबाद 71 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली.
भारताकडून आर अश्विनने 66 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर श्रेयस अय्यरने 46 चेंडू खेळताना 29 धावा केल्या. श्रेयस अय्यरने त्याच्या खेळीत 4 चौकार लगावले. अश्विनने फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने एकूण 6 गडी बाद केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अश्विनने सामनावीर पुरस्कारासह आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : आफ्रिदी चीफ सिलेक्टर होताच माजी क्रिकेटपटूने उडवली खिल्ली, शेअर केला फोटो
अश्विनच्या या पोस्टवर श्रीलंकेच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. निबराज रमजान नावाच्या चाहत्याने म्हटलं की, तुम्ही सामनावीरचा पुरस्कार मोमिनुल हकला द्यायला हवा होता ज्याने तुमचा झेल सोडला होता. जर तो झेल घेतला असता तर भारत 89 धावांतच गुंडाळला असता.
Oh no ! I thought I blocked you, oh sorry that’s the other guy. what’s his name?? Yes Daniel Alexander that’s the name !! Imagine what you both would do if India dint play cricket https://t.co/FFqBvAPtDh
— Ashwin (@ashwinravi99) December 25, 2022
चाहत्याच्या या कमेंटवर अश्विनने उत्तर देताना म्हटलं की, "ओह नो, मला वाटलं की मी तुला ब्लॉक केलं आहे. तो दुसरा आहे त्याचं नाव काय? हा डॅनियल अलेक्झांडर हे नाव आहे. कल्पना करा की जर भारत क्रिकेट खेळत नसता तर तुम्ही दोघांनी काय केलं असतं?"
हेही वाचा : आधी भडकला, नंतर दिलं गिफ्ट; विराटच्या वागण्याचं होतंय कौतुक
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका भारताची या वर्षातली अखेरची मालिका होती. आता नव्या वर्षात श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये 3 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. यानतंर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. या दौऱ्यासाठी अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.