आता पुरुष-महिला क्रिकेट संघांना समान मानधन
मुंबई, 27 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुरुष आणि महिला क्रिकेटर्सना समान मानधनाची घोषणा केली आहे. अशी घोषणा करणारं बीसीसीआय हे न्यूझीलंडनंतरचं दुसरं क्रिकेट बोर्ड ठरलं आहे. बीसीसीआयनं आज या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या महिला क्रिकेटर्सना पुरुष क्रिकेटर्सऐवढच मानधन मिळणार आहे.
फॉरमॅटनुसार किती मानधन कसोटी - 15 लाख वन डे - 6 लाख टी20 - 3 लाख काय म्हणाले जय शाह? आजटच्या निर्णयाबाबत जय शाह म्हणाले की, ‘मला जाहीर करण्यात आनंद होत आहे की बीसीसीआय क्रिकेटमधला भेदभाव संपवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकत आहे. आम्ही करारबद्ध खेळाडूंसाठी समान मानधन धोरण लागू करत आहोत. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी यापुढे समान असेल. आम्ही एका नव्या युगात प्रवेश करत आहोत.’ माजी महिला क्रिकेटर्सकडून स्वागत
भारताची माजी कर्णधा अंजुम चोप्रानं ही एक मोठी बातमी असल्याचं म्हटलं आहे. यासाठी अंजुमनं बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार माने आहेत.