JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानी क्रिकेटरचं धक्कादायक कृत्य, क्रिकेटप्रेमीसोबत केली लाजिरवाणी गोष्ट, पाहा VIDEO

पाकिस्तानी क्रिकेटरचं धक्कादायक कृत्य, क्रिकेटप्रेमीसोबत केली लाजिरवाणी गोष्ट, पाहा VIDEO

पाकिस्तानी क्रिकेटर जे चाहत्यासोबत वागला तो व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चिड, याला काय करावं बरं!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटरने गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूवर त्याने मारण्यासाठी मैदानात बॅट उगारली होती. त्यानंतर आयसीसीने त्याला दंडही ठोठावला होता. पण या क्रिकेटरचा उद्दामपणा काही गेला नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटरची पुन्हा एकदा मग्रुरी पाहायला मिळाली आहे. एक चाहता त्याच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी आला. मात्र त्याने चाहत्याला जास्त भाव न देता निघायला लागला. तिथे असलेल्या चाहत्यांनी क्रिकेटला हात लावला. तर पाकिस्तानी क्रिकेटरने हात झटकला. आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. आशिया कपमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमचे खेळाडू आपल्या देशात परतले. त्यावेळी आसिफ अलीने विमानतळावर एका चाहत्याशी गैरवर्तन केले. विमानतळावर एका चाहत्याला आसिफ अलीसोबत सेल्फी घ्यायचा होता. चाहत्याने आसिफ अलीचा हात पकडला तेव्हा आसिफने लगेच हात मागे घेतला आणि चाहत्याकडे रागाने बघू लागला. आसिफच्या या कृत्यानंतर त्याच्यावर खूप टीका केली जात आहे. हे वाचा-T20 World Cup नंतर विराट कोहली घेणार संन्यास?

संबंधित बातम्या

हे वाचा-T20 World Cup मधून बाहेर, रविंद्र जडेजानं चाहत्यांशी शेअर केली मनातली गोष्ट आशिया कपमध्ये आसिफने गैरवर्तन केलं होतं. त्याला आयसीसीने फीच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली होती. या सगळ्यानंतरही त्याचं वागणं काही सुधारलेलं दिसलं नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आसिफला खूप ट्रोल केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या