मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup नंतर विराट कोहली घेणार संन्यास?

T20 World Cup नंतर विराट कोहली घेणार संन्यास?

 विराट कोहली

विराट कोहली

वर्ल्ड कपनंतर विराट कोहली संन्यास घेण्याच्या तयारीत? दिग्गज खेळाडून केला दावा

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : क्रिकेटमधील (Cricket) किंग म्हटलं की विराट कोहली (Virat Kohli) हेच नाव डोळ्यासमोर येतं. भारतीय क्रिकेट संघाचा हुकूमी एक्का असणारा विराट म्हणजे भारतीय क्रिकेटला (Indian Cricket Team) मिळालेला हिराच आहे.

ज्याची सर जगातील कोणत्याही बॅट्समनला (, Batsman) नाही. कोहलीने स्वत:चे अनेक रेकॉर्डही बनवले आहेत. मात्र, आता याच किंग कोहलीबद्दल एक मोठं वक्तव्य समोर आलंय. कोहली टी-20 क्रिकेटमधून टी-20 वर्ल्डकप नंतर (T20 World Cup 2022) संन्यास घेईल, अशा स्वरुपाचं वक्तव्य एका माजी क्रिकेटरने केल्याने विराटच्या फॅन्सना धक्का तर बसलाच, पण टी-20 मधील विराटपर्व संपणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धा 2022 टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहलीसाठी खूप यशस्वी ठरली. या स्पर्धेपूर्वी तो अतिशय खराब फॉर्ममध्ये होता, पण या स्पर्धेत कोहलीची बॅटिंग खूपच चांगली झाली.

आशिया कप 2022 च्या शेवटच्या मॅचमध्ये त्याने पहिलं आंतरराष्ट्रीय टी-20 शतकही झळकावलं. मात्र, त्यातच आता एक असं विधान समोर आलं आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. हे विधान कोहलीच्या निवृत्तीसंबंधी आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) हे धक्कादायक विधान केलं आहे. विराट कोहली टी-20 वर्ल्डकप 2022 नंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करेल, असा विश्वास शोएबला वाटतोय.

टी-20 मध्ये विराटची उत्कृष्ट कामगिरी

विराट कोहलीने आतापर्यंत 104 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 51.94 च्या सरासरीने 3584 रन्स केल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 32 अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 138.37 राहिला आहे. तर नुकत्याच झालेल्या आशिया कप 2022 मध्ये विराटने 5 मॅचमध्ये 92 च्या सरासरीने 276 रन्स केल्या. यात अफगाणिस्तानविरुद्ध 122 रन्सच्या इनिंगचा समावेश आहे. त्यातच कोहलीच्या निवृत्तीबद्दल शोएब अख्तरने वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं शोएब काय म्हणाला?

पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तर लाइव्ह सेशन सुरू असताना विराट कोहलीच्या निवृत्तीवर म्हणाला, 'विराट कोहली टी-20 वर्ल्डकप 2022 नंतर टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेईल. तो हे करू शकतो, जेणेकरून त्याला क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये जास्त काळ खेळता येईल.

त्याच्या जागी मी असतो तर भविष्याचा विचार करून हाच निर्णय घेतला असता.’ तर, अलीकडेच पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनेही विराटला निवृत्तीचा सल्ला दिला होता. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी बोलतातना आफ्रिदी म्हणाला होता की, 'विराट कोहलीने त्याच्या करिअरची चांगली सुरुवात केली होती.

तो चॅम्पियन खेळाडू आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला निवृत्ती घ्यावी लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर असताना निवृत्तीची घोषणा केली पाहिजे.’

विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत अशी वक्तव्यं येऊ लागल्याने मात्र त्याच्या चाहत्यांना विराटपर्व संपणार का? हा प्रश्नही सतावू लागलाय. मात्र, खुद्द विराट कोहलीने स्वतःच्या निवृत्तीबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे दिलासादायक आहे.

First published:

Tags: T20 world cup 2022, Virat kohli, Virat kohli salary