अजिंक्य रहाणे
कोईंबतूर, 25 सप्टेंबर**:** अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट झोन संघानं यंदाच्या दुलीप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. बीसीसीआयच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच स्पर्धेत रहाणे अँड कंपनीनं वर्चस्व गाजवलं. अंतिम सामन्यात वेस्ट झोननं साऊथ झोनचा 294 धावांनी धुव्वा उडवून विजेतेपद पटकावलं. तामिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये स्पर्धेचा हा अंतिम सामना पार पडला. पण या सामन्यादरम्यान एक घटना घडली ज्यामुळे वेस्ट झोनचा कर्णधार रहाणेचा पारा चढला आणि त्यानंतर त्यानं आपल्याच संघातल्या एका युवा खेळाडूला सरळ मैदानातून ड्रेसिंग रुममध्ये धाडलं. रहाणेकडून आधी समज मग शिक्षा वेस्ट झोन आणि साऊथ झोन संघातल्या या फायनलमध्ये मुंबईच्या यशस्वी जयस्वालनं द्विशतकी खेळी केली. त्यामुळे वेस्ट झोननं साऊथ झोनसमोर 529 धावांचं भलं मोठं लक्ष्य उभं केलं. साऊथ झोन दुसऱ्या डावात बॅटिंगला उतरला तेव्हापासून शॉर्ट लेगला असलेला यशस्वी जयस्वाल त्यांच्या बॅट्समनवर कमेंट करत होता. हे मैदानात अनेकवेळा झालं. शेवटी साऊथ झोनच्या रवी तेजानं याची अम्पायर्सकडे तक्रार केली. त्यानंतर रहाणेनं स्लेजिंग करणाऱ्या जयस्वालला मैदानातच समज दिली. पण समज देतेवेळीही यशस्वी मात्र समोरच्या फलंदाजाकडे पाहून बोलत असताना व्हिडीओत दिसत आहे. हेही वाचा - MS Dhoni: रिटायरमेंट नाही तर धोनीनं केलं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग, पण का? पाहा Video जयस्वालची बडबड सुरुच वॉर्निंग मिळाल्यानंतरही जयस्वालची बडबड सुरुच राहिली. त्यावेळी मात्र कर्णधार रहाणेचा पारा चढला आणि त्यानं आपल्याच टीममधल्या यशस्वी जयस्वालला या वागणुकीसाठी थेट ड्रेसिंग रुमचा रस्ता दाखवला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
यशस्वीची दोन द्विशतकं दरम्यान रहाणेनं बाहेरचा रस्ता दाखवलेल्या जयस्वालनं यंदाच्या दुलीप ट्रॉफीत मात्र खोऱ्यानं धावा ओढल्या. त्यानं तीन सामन्यात तब्बल दोन द्विशतकं ठोकली. नॉर्थ झोनविरुद्ध त्यानं 228 तर फायनलमध्ये साऊथ झोनविरुद्ध 265 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीनं दुलीप करंडकात रहाणेच्या वेस्ट झोननं विजेतेपद आपल्या नावावर केलं.
पण फायनलमधल्या स्लेजिंगमुळे यशस्वी जयस्वालला मात्र कर्णधाराच्या रोषाला सामोरं जावं लागलं.