मुंबई, 05 ऑक्टोबर : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे साठी आज दसरा खऱ्या अर्थाने सोनियाचा दिन ठरला आहे. अजिंक्य रहाणेची बायको राधिका धोपावकरने अजिंक्यला विजयादशमीदिवशी सर्वात मौल्यवान असं गिफ्ट दिलं आहे. रहाणेने आपलं हे गिफ्ट आपल्या चाहत्यांनाही सांगितलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी नवा पाहुणा आला आहे. अजिंक्य दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची बायको राधिकाने आज दसऱ्यादिवशी एका मुलाला जन्म दिला आहे. योगायोग म्हणजे आजच रहाणेच्या पहिल्या मुलीचा आर्याचा वाढदिवस आहे. दसरा आणि लेकीच्या वाढदिवशी रहाणेला त्याच्या बायकोने दिलेलं हे अमूल्य असं गिफ्टच म्हणावं लागेल. हे वाचा - हा गल्लीतला Cricket Video पाहून PM Modi सुद्धा झाले इम्प्रेस; असं काय आहे यात पाहा अजिंक्य रहाणे आपल्याला मुलगा झाल्याची गूड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने ट्विट केलं आहे. “आज सकाळी राधिका आणि मी आमच्या बाळाचं या जगात स्वागत केलं आहे. राधिका आणि बाळ दोघंही स्वस्थ आहेत. तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वादासाठी तुमचे आभार”
अजिंक्य रहाणेने 26 सप्टेंबर 2014 साली राधिकासोबत लग्न केलं. याच्या 5 वर्षांनंतर 2019 साली या दोघांना पहिलं मूल झालं. त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी आपण पुन्हा आईबाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं. प्रेग्नंट राधिका, रहाणे आणि आर्या अशा तिघांचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ऑक्टोबरमध्ये आपलं बाळ या जगात येणार असल्याचं या कपलने सांगितलं. हे वाचा - T20 World Cup: मॅच फिनिशर की पॉवर प्ले स्पेशालिस्ट? वर्ल्ड कपमध्ये या बॅट्समनचा काय असणार रोल? आज 5 ऑक्टोबरला त्यांच्या बाळाचं आगमन झालं. 5 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांची पहिली मुलगी आर्याचा जन्म झाला होता. त्यानंतर 3 वर्षांनी बरोबर पहिल्या मुलीच्या जन्मादिवशीच त्यांना दुसरा मुलगा झाला आहे.