JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंचा बॉलीवूड गाण्यावर विक्ट्री डान्स, Video Viral

टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंचा बॉलीवूड गाण्यावर विक्ट्री डान्स, Video Viral

ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी बॉलिवूडच्या काला चष्मा या पॉप्युलर गाण्यावर डान्स केला. याचा विडिओ आयसीसीने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जानेवारी : रविवारी आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना पारपडला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवत  पहिल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने हा करिष्मा करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर महिला क्रिकेटपटूंनी बॉलिवूड गाण्यावर धम्माल विक्ट्री डान्स केला.

दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीपासूनच स्पर्धेवर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. कर्णधार शफाली वर्मा यांनी नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि  भारताच्या गोलंदाजांनी  तो निर्णय अतिशय खरा ठरवला आणि इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 17 ओव्हरमध्ये सर्वबाद केले. यात भारताच्या गोलंदाज तितास साधू, पार्श्वि चोप्रा आणि  अर्चना देवी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार शफाली वर्मा, सोनम यादव आणि मन्नत कश्यप यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. U19 Womens WC: टीम इंडियाने शफालीच्या नेतृत्वाखाली घडवला इतिहास इंग्लंडने भारतासमोर वर्ल्ड कप विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 69 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान भारताने लीलया पेलले आणि अवघ्या 13 ओव्हरमध्ये इंग्लंडने दिलेले 69 धावांचे आव्हान पूर्ण केले. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.

संबंधित बातम्या

ऐतिहासिक विजयानंतर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी बॉलिवूडच्या काला चष्मा या पॉप्युलर गाण्यावर डान्स केला. याचा विडिओ आयसीसीने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात भारताच्या चॅम्पियन्स गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या