JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / दिव्य दृष्टीने महाभारतातील युद्धाच्या घडामोडी धृतराष्ट्राला सांगणारा संजय कोण होता?

दिव्य दृष्टीने महाभारतातील युद्धाच्या घडामोडी धृतराष्ट्राला सांगणारा संजय कोण होता?

राजा धृतराष्ट्र संजयचा विशेष सन्मान करत असे. संजय हा गावाल्गण नावाच्या विद्वान विणकराचा मुलगा होता. आपल्या पौराणिक ग्रंथ आणि महाभारतातील कथांनुसार संजय हा अतिशय नम्र आणि धार्मिक स्वभावाचा होता.

जाहिरात

महाभारतातील संजय कोण होता?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल : आपण महाभारतातील संजयाबद्दल नेहमी बोलतो. महाभारतातील युद्धाचं थेट वर्णन अंध राजा धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजयला विशेष दिव्य दृष्टी मिळाली होती. पण हा संजय कोण होता? तो महाभारतापासून आजपर्यंत अमर का आहे ? युद्धानंतर त्याचं काय झालं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. महाभारतातील संजय हा विणकर समाजातील होता. तसेच तो धृतराष्ट्राचा मंत्रीदेखील होता. महर्षी वेद व्यास यांचा तो शिष्य होता. धृतराष्ट्राच्या राजसभेत त्याचा समावेश होता. राजा धृतराष्ट्र संजयचा विशेष सन्मान करत असे. संजय हा गावाल्गण नावाच्या विद्वान विणकराचा मुलगा होता. आपल्या पौराणिक ग्रंथ आणि महाभारतातील कथांनुसार संजय हा अतिशय नम्र आणि धार्मिक स्वभावाचा होता. देशातील पहिला आणि एकमेव स्वदेशी विश्वकोश असलेल्या भारत कोशामध्येही संजयाबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. संजय या शब्दाचा अर्थ विजय असा होतो. त्याचं पूर्ण नाव संजय गावलगण असं होतं. कुरुक्षेत्रात युद्ध सुरू असताना संजय हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला युद्धाची स्थिती कथन करत असे, असं सांगितलं जातं. संजयाने ज्याप्रकारे महाभारतातील युद्धाचं संपूर्ण वर्णन केलं आहे, युद्धाची रचना आणि बारकावे सांगण्याबरोबरच ग्रहांची स्थिती तसंच त्याचे परिणाम सांगितले त्यावरून तो अतिशय बुद्धिमान होता असं दिसून येतं.

प्रामाणिकपणे भाष्य धृतराष्ट्राने संजयाला कुरुक्षेत्रावरील युद्धापूर्वी पांडवांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवलं होतं. तेथून परतल्यावर त्याने युधिष्ठिराचा संदेश धृतराष्ट्राला सांगितला होता. संजय भगवान श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त होता. तो जरी धृतराष्ट्राचा मंत्री असला तरी त्याला पांडवांविषयी सहानुभूती होती. धृतराष्ट्र आणि त्याच्या पुत्रांना अधर्म करण्यापासून रोखण्यासाठी कठोर शब्द बोलण्यासही तो मागे-पुढे पाहत नव्हता.

संजयच्या बोलण्याचा धृतराष्ट्राला यायचा राग संजय वेळोवेळी राजाला योग्य तो सल्ला देत असे. दुसऱ्यांदा द्युतात हरल्यानंतर पांडव 13 वर्षांसाठी वनवासात गेले, तेव्हा संजयाने धृतराष्ट्राला इशारा दिला की, हे राजन, कुरु वंशाचा संपूर्ण नाश निश्चित आहे, पण त्यासोबत निरपराध लोकांचा नाहक बळी घेतला जाईल. मात्र त्याच्या स्पष्टवक्तेपणाचा धृतराष्ट्राला अनेकदा राग यायचा. मे महिन्यात 3 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन; या 6 राशींना संपूर्ण महिना आनंदी महालात बसून धृतराष्ट्राला सांगायचा युद्धाची परिस्थिती युद्ध टाळता येणार नाही हे निश्चित झाल्यावर महर्षी वेद व्यासांनी संजयला दिव्य दृष्टी दिली. जेणेकरून तो महालात बसून रणांगणातील सर्व गोष्टी पाहू शकेल आणि धृतराष्ट्राला युद्धाची स्थिती सांगू शकेल. यानंतर संजयाने महाभारताच्या युद्धाची प्रत्येक घडामोड धृतराष्ट्राला सांगितली. यावरुन संजय हा आपल्या देशातला पहिला भाष्यकार होता, असंही म्हणता येईल. युद्धानंतर महर्षी व्यासांनी दिलेली दिव्य दृष्टीही नष्ट झाली. भगवान श्रीकृष्णाचं विराट रूप, जे केवळ अर्जुनाला दिसत होतं, संजयानेही ते दिव्य दृष्टीनं पाहिलं होतं. शनीच्या ग्रहस्थितीमुळं दुर्मिळ शश महापुरुष योग; या 5 राशीच्या लोकांसाठी वरदान असं का झालं होतं? महाभारत किंवा नंतरच्या ग्रंथांमध्ये संजयला दिव्यदृष्टी मिळाल्याचा कोणताही शास्त्रीय आधार मिळत नाही. महर्षी वेद व्यास यांचा हा चमत्कार मानला जातो. खरंतर संजय वेद व्यासांचा शिष्य होता आणि त्याची त्यांच्यावर खूप श्रद्धा होती. तसेच तो धृतराष्ट्राला मानणारा होता. तो धार्मिक होता. धृतराष्ट्राचा मंत्री असून त्याला नेहमीच पांडवांची बाजू योग्य वाटत असे. कौरवांबाबत कठोर शब्द वापरण्यातही संजय कधी डगमगला नाही. नंतरच्या काळात लिहिलेल्या अनेक भाष्यांमध्ये संजयाला दिव्यदृष्टी कशी प्राप्त झाली आणि ती कशी संपली याबद्दल विशेष उल्लेख नाहीत. या चुकीच्या सवयींमुळे कुंडलीत सूर्याची ग्रहस्थिती होते कमकुवत; अडचणी वाढतात युद्धानंतर घेतला संन्यास महाभारताच्या युद्धानंतर अनेक वर्ष संजय युधिष्ठिराच्या राज्यात राहिला. त्यानंतर त्याने धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांच्याबरोबर संन्यास घेतला. धृतराष्ट्राच्या मृत्यूनंतर तो हिमालयात निघून गेल्याचे उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहेत.

अर्जुनाचा होता बालमित्र संजयची अर्जुनाशी लहानपणापासून मैत्री होती. त्यामुळे संजयाला अर्जुनाच्या अंतःपुरात प्रवेश करण्याचा अधिकार होता. मात्र या ठिकाणी नकुल-सहदेव आणि अभिमन्यूला प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या