मुंबई, 4 सप्टेंबर : हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांची पूजा केली जाते. याशिवाय अनेक अशी प्रतीके आहेत ज्यांची पूजा केली जाते. पूजा किंवा शुभ कार्यापूर्वी ही चिन्हे बनवण्याचा नियम प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. धार्मिक मान्यतांनुसार हे चिन्हे ब्रह्मज्ञानाच्या गूढ रहस्यांचा खजिना आहेत. स्वास्तिक चिन्न तुम्ही नक्कीच पाहिले असेल आणि तुम्ही अनेकदा ते काढले देखील असेल. वरवर साधे दिसणाऱ्या स्वस्तिकावर तुम्ही लक्ष केंद्रित केले तर ते एखाद्या व्यक्तीला परमोच्च स्थितीत नेऊ शकते. आजच्या लेखात भोपाळचे ज्योतिषी विनोद सोनी पोद्दार आपल्याला स्वस्तिक चिन्हाचा शाब्दिक अर्थ आणि त्याचे फायदे सांगत आहेत. ‘स्वस्तिक’चा शाब्दिक अर्थ स्वस्तिक हा शब्द सु+अस+क ने बनलेला आहे. ‘सु’ म्हणजे चांगले. ‘अस’ म्हणजे ‘शक्ती’ किंवा ‘अस्तित्व’ आणि ‘क’ म्हणजे ‘कर्ता’ किंवा करणारा असा होतो. ‘स्वस्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘चांगला’ किंवा ‘मंगल’ करणारा असा होतो. ‘स्वस्तिक’ या शब्दाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे किंवा जातीचे कल्याण असा नसून संपूर्ण जगाचे किंवा ‘वसुधैव कुटुंबकम्’ अशा आशयाचा आहे.
Vastu Tips : पारिजाताचे झाड लावल्याने मिळतात हे फायदे, दिशा मात्र चुकवू नका‘स्वस्तिक’चा अर्थ काय आणि ते कसे असते? स्वस्तिकमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा असतात, ज्या पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेला वळतात. यापुढे गेल्यानंतरही या रेषा त्या-त्या टोकाला थोड्या पुढे वाकलेल्या आहेत. ‘स्वस्तिक क्षेम कायति, इति स्वस्तिकः’ म्हणजे ‘स्वस्तिक हे कुशलक्षेम किंवा कल्याणाचे प्रतीक आहे. दोन प्रकारचे असतात स्वस्तिक 1. पहिल्या प्रकाच्या स्वस्तिकमध्ये रेषा एकमेकांना भेदून पुढे जातात आणि त्यानंतर आपल्या उजवीकडे वळतात. त्याला ‘स्वस्तिक’ म्हणतात. हे एक शुभ चिन्ह मानले जाते आणि ते आपली प्रगतीचे संकेत असते. 2. दुसऱ्या आकृतीत दोन्ही रेषा एकमेकांना भेदून मागच्या दिशेने म्हणजेच आपल्या डावीकडे वळतात. याला ‘डाव्या हाताचे स्वस्तिक’ म्हणतात. भारतीय संस्कृतीत हे अशुभ मानले जाते. जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या ध्वजात हे ‘वामावर्त स्वस्तिक’ होते. सूर्याचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक ऋग्वेदात स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक मानले गेले असून त्याच्या चार भुजांना चार दिशांची उपमा देण्यात आली आहे. सिद्धांत सार ग्रंथात हे विश्व ब्रम्हांडाचे प्रतीक मानले गेले आहे. त्याचा मध्य भाग विष्णूची कमळ नाभी आणि त्याच्या रेषा ब्रह्मदेवाचे चार मुख, चार हात आणि चार वेदांचे प्रतिक आहेत. नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा मंगल चिन्हाचे प्रतिक भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्वस्तिक हे मंगल चिन्ह मानले जाते. विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आणि धन, वैभव व ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीची पूजाही शुभ लाभ आणि स्वस्तिकासोबत करण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत याला विशेष स्थान आहे. त्यामुळे व्यक्तीची कुंडली बनवताना किंवा कोणतेही शुभ आणि शुभ कार्य करताना प्रथम स्वस्तिक चिन्हांकित केले जाते.