JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Vat Purnima 2023 : वटसावित्रीची पूजा करताना चुकूनही करू नका 3 गोष्टी, पाहा महत्त्वाचा Video

Vat Purnima 2023 : वटसावित्रीची पूजा करताना चुकूनही करू नका 3 गोष्टी, पाहा महत्त्वाचा Video

वटसावित्रीची पूजा करताना ‘या’ चुका काहीजणी करतात. तुम्ही त्यामध्ये नाही ना?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 2 जून : जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीवरील प्रेमापोटी यमकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील प्रसिध्द आहे. या दिवशी महिला मोठ्या उत्साहाने वादाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून  प्रार्थना करतात. यंदा 3 जून शनिवारी दुपारी 11 नंतर वटपौर्णिमा सुरू होत आहे. या दिवशी वट म्हणजेच ब्रह्म सावित्रीची पूजा करायची असते. ही पूजा करताना महिलांकडून काही चुका अनावधानानं घडतात. या कोणत्या चुका आहेत? त्या टाळण्यासाठी काय करावं याबाबत जालन्यातील महंत सुनील प्रभू यांनी माहिती दिली आहे. काय काळजी घ्यावी? 1) सर्वात आधी पूजेचे साहित्य हे स्वच्छ असावे. ताटातील फुल आणि फळे तजेलदार असावेत. सुकलेले किंवा किडलेली फळं पूजेसाठी वापरू नये. 2) वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नयेत. अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात. अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य नाही. 3) ब्रम्हावित्रीची पूजा करत असताना पूजेचे ताट वडाच्या झाडापासून दूर ठेवावे. ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते. पूजा करत असताना आग लागल्यास पूजेचे महत्व राहत नाही. वटसावित्रीची पूजा करण्यापूर्वी पाहा ‘हा’ Video, मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीनं वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. ही पूजा करताना फुलं आणि फळं स्वच्छ ठेवावी. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत नाही. वातावरण प्रसन्न राहते, असा सल्लाही सुनील महाराज ठोसर यांनी दिला आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या