JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / स्वयंपाक घरातील तवा आणि कढई देतात राहू ग्रहाला आमंत्रण

स्वयंपाक घरातील तवा आणि कढई देतात राहू ग्रहाला आमंत्रण

vastushastra - ज्योतिषशास्त्रात राहू हा खूप कष्ट देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे सर्वजण राहुला खूप घाबरून असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : जीवनात खूप अडचणी येत असतील खूप त्रास होत असेल तर याचे कारण आपल्या घरातल्या काही चुकीच्या सवयी नाहीत ना ..  ज्योतिषशास्त्रात राहू हा खूप कष्ट देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे सर्वजण राहुला खूप घाबरून असतात. आपल्या पत्रिकेतील राहू ग्रह कधीच खराब होऊ नये असे सर्वाना वाटते त्यामुळे राहू ग्रह हा कसा चांगला राहील याचा सर्वजन प्रयत्न करतात. या राहू ग्रहाचा थेट संबंध हा स्वयंपाक घरातील तव्याशी आणि कढईशी असतो.

अघोरींबद्दलच्या गोष्टी: कच्चे मानवी मांस खाण्यापासून ते प्रेताशी शारीरिक संबंधांपर्यंत

आपल्या स्वयंपाक घरात तवा -कढई ठेवण्याच्या काही खास जागा वास्तु शास्त्रात ठरवलेल्या असतात. कधीही तवा आणि कढई स्वयंपाक घरात सहजरीत्या कोणाच्याही नजरेत दिसतील अशा पद्धतीने ठेऊ नये. अशा ठिकाणी ठेवावी की जिथे कोणाचीही नजर सहज रित्या तिथे पडू नये . शक्यतो तवा व कढई ही स्वयंपाक घरातील कपाटात ठेवावी.

त्याचप्रमाणे तवा व कढई ही रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्या पूर्वी साफ करून ठेवावी. चुकूनही तवा व कढई ही न धुताच ठेवल्यास आपल्याला राहू दोष लागतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर लगेचच तवा आणि कढई साफ करून ठेवावी.

असा सर्प दृष्टीस पडणे असते शुभ, दोनतोंडी नाग दिसताच उजळते भाग्य!

तसेच पोळ्या करण्याच्या आधी तव्यावर थोडेसे मीठ टाकावे. गरम तव्यावर मीठ टाकल्याने खूप सारे वास्तु दोष नाहीसे होतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या