जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / अघोरींबद्दलच्या गोष्टी: कच्चे मानवी मांस खाण्यापासून ते प्रेताशी शारीरिक संबंधांपर्यंत

अघोरींबद्दलच्या गोष्टी: कच्चे मानवी मांस खाण्यापासून ते प्रेताशी शारीरिक संबंधांपर्यंत

अघोरींबद्दलच्या गोष्टी: कच्चे मानवी मांस खाण्यापासून ते प्रेताशी शारीरिक संबंधांपर्यंत

Aghori Sadhu -अघोरी या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेत ‘प्रकाशाकडे’ असा होतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई,12 डिसेंबर:**अघोरी हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात बिभत्स आकृती तयार होते. सर्वांगाला राख फासलेले, मानवी मांस खाणारे, जादूटोणा करणारे म्हणून त्यांना ओळखले जाते. अघोरी हा शब्द पवित्र आणि सर्व वाईटांपासून मुक्त मानला जातो. पण अघोरींचे राहणीमान आणि जगण्याची पद्धत याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. अघोरींच्या या रहस्यमय जगाशी संबंधित काही अज्ञात पैलू आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

1. कच्चे मानवी मांस खातात

अनेक मुलाखती आणि माहितीपटांमध्ये अनेक अघोरींनी स्वतः कबूल केले आहे की, त्यांनी कच्चे मानवी मांस खाल्ले आहे. अनेकदा हे अघोरी स्मशानभूमीतच राहतात आणि अर्धे जळालेले मृतदेह बाहेर काढतात आणि त्यांचे मांस खातात, शरीरातील द्रवही वापरतात. यामागे त्यांचा असा विश्वास आहे की असे केल्याने त्यांची तंत्र करण्याची शक्ती अधिक मजबूत होते. याउलट, ज्या गोष्टी सर्वसामान्यांना घृणास्पद वाटतात, अघोरी लोकांसाठी तो त्यांच्या आध्यात्मिक साधनेचा एक भाग आहेत.

2. शिव आणि शव यांचे उपासक

अघोरी पूर्णपणे शिवामध्ये विलीन होऊ इच्छितात. अघोर हे शिवाच्या पाच रूपांपैकी एक आहे. शिवाची पूजा करण्यासाठी हे अघोरी प्रेतावर बसून साधना करतात. ‘मृतदेहातून शिव मिळवण्याचा’ हा मार्ग अघोर पंथाचे लक्षण आहे. हे अघोरी 3 प्रकारची साधना करतात, शव साधना, ज्यामध्ये मृत शरीराला मांस आणि मद्य अर्पण केले जाते. शिव साधना, ज्यामध्ये मृत शरीरावर एका पायावर उभे राहून शिवाची पूजा केली जाते आणि स्मशान साधना, जिथे हवन केले जाते.

‘अपना टाइम’ आलाच! घड्याळात अनेकदा 11:11 वाजलेले दिसतात का? नशीब बदलण्याची हीच ती वेळ

3. मृत शरीराशी शारीरिक संबंध

अघोरी साधू साधनेसोबतच प्रेतांशी शारीरिक संबंध ठेवतात, अशी प्रचलित धारणा आहे. खुद्द अघोरीही या गोष्टीवर विश्वास ठेवतात. यामागचे कारण ते सांगतात की, ही शिव आणि शक्तीची उपासना करण्याची पद्धत आहे. ते म्हणतात की हा सर्वात सोपा मार्ग आहे पूजा करण्याचा, अत्यंत वाईट परिस्थितीतही देवाची भक्ती. मृत शरीरासोबत शारीरिक क्रिया करतानाही जर मन भगवंताच्या भक्तीमध्ये गुंतले असेल तर यापेक्षा आध्यात्मिक साधनेची पातळी काय असेल, असे त्यांचे मत आहे.

4. केवळ मृत शरीरच नाही तर जिवंतांशीही संबंध

इतर साधूंप्रमाणे ते ब्रह्मचर्य पाळत नाहीत. तर प्रेतावर राख फासून मंत्र आणि ढोलताशांमध्ये हे शारीरिक संबंध ठेवतात. शारीरिक संबंध ठेवण्याची ही क्रियादेखील साधनेचा एक भाग आहे, विशेषतः जेव्हा स्त्रीची मासिक पाळी सुरू असते. असे केल्याने अघोरींची शक्ती वाढते असे म्हणतात.

5. नरमुंड परिधान करतात

जर तुम्ही अघोरींची छायाचित्रे पाहिली असतील, तर तुम्हाला असे आढळले असेल की त्यांच्यासोबत नेहमी मानवी कवटी असते. अघोरी लोक मानवी कवटीचा वापर अन्नासाठी भांडे म्हणून करतात, त्यामुळे त्यांना कापालिक म्हणतात. ही प्रेरणा त्यांना शिवापासूनच मिळाल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथांनुसार, एकदा शिवाने ब्रह्मदेवाचे मस्तक कापले आणि त्याचे मस्तक घेऊन ते संपूर्ण विश्वात फिरले. शिवाच्या या रूपाचे अनुयायी असल्याने अघोरीही नरमुंड सोबत ठेवतात.

या मुली असतात खूपच लाजाळू; बुद्धीचं नाही तर मनाचं ऐकतात!

6. अघोरी फक्त कुत्रे पाळतात 

अघोरींना कुत्रे खूप आवडतात. गाय, बकरी किंवा मानव यासारख्या इतर सर्व प्राण्यांपासून अंतर राखणारे अघोरी आपल्यासोबत आणि आजूबाजूला कुत्रा पाळणे पसंत करतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात