JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / घरातील पाण्याची टाकी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? नाही होणार धनहानी, रोगराई

घरातील पाण्याची टाकी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? नाही होणार धनहानी, रोगराई

घरातील पाण्याची जागा, टाकी किंवा पिण्याचे पाणी या दिशेला ठेवल्यास घरात कोणतीही समस्या येत नाही. विरुद्ध दिशेला पाणी ठेवल्यास घरामध्ये धनहानी आणि रोगराई वाढू शकते.

जाहिरात

पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवावी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 मे : ज्योतिषशास्त्र, बृहतसंहिता या ग्रंथात जल, अग्नी, वायु, आकाश आणि पृथ्वी या घटकांसाठी वेगवेगळ्या दिशा सांगितल्या आहेत. घरातील कोणत्याही गोष्टी ठेवताना त्यांचं वास्तुशास्त्र पाहावं, असं न केल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ लागतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही जल तत्वासाठी आहे. घरातील पाण्याची जागा, टाकी किंवा पिण्याचे पाणी या दिशेला ठेवल्यास घरात कोणतीही समस्या येत नाही. विरुद्ध दिशेला पाणी ठेवल्यास घरामध्ये धनहानी आणि रोग होतात. यासोबतच घरात राहणाऱ्या लोकांच्या समस्याही वाढू लागतात, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पाणी ठेवण्याची योग्य जागा - वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला पाण्याची टाकी ठेवणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या स्थितीत पाणी ठेवल्याने चांगली संपत्ती मिळते. याशिवाय घरात प्रगती आणि समृद्धीही येते. उत्तर दिशेला पाण्याची टाकी किंवा पिण्याचे पाणी ठेवल्यास घरात सुख-शांती वाढते. पाण्याची टाकी उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारते. यासोबतच घरातील वातावरण शांत राहते.

या दिशांना पाणी ठेवू नये - - वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, आग्नेय दिशा पाण्याची टाकी किंवा पाण्याचे ठिकाण बनवण्यासाठी अजिबात योग्य नाही. ही दिशा अग्नीची दिशा मानली जाते, अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. नवरी मुलगीला मेहंदी का लावली जाते? लग्न आहे मेहंदी नाही असं होतच नाही, कारण.. - घराच्या दक्षिण दिशेला पाण्याची टाकी किंवा भूमिगत टाकी नसावी. यामुळे कुटुंबात अस्वस्थता आणि अनपेक्षित नुकसान होते. - वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी नसावी. या ठिकाणी पाणी असल्याने घरातील लोकांना आजार होतात, तसेच कर्जही वाढते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक आजारही होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या कृपेनं होईल सगळं सुरळीत; शुक्रवारी करण्याचे हे उपाय आहेत खास (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या