वधू-वराच्या हातांवर आणि पायावर मेहंदी लावली जाते. लग्नात मेहंदी लावण्याची प्रथा बहुतांश राज्यांमध्ये प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. वधूच्या हातावर आणि पायावर मेंदी लावून सुंदर डिझाइन्स बनवल्या जातात. हा विधी वधू आणि वरच्या कुटुंबातील लोक आणि मित्रांद्वारे केला जातो.
हा विधी का केला जातो? लग्नात मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूचा रंग उजळतो आणि तिचं सौंदर्य वाढतं. हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे.
मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. मेहंदीला प्रेमाचं प्रतिकही मानलं जातं, मेहंदीच्या रंगाबद्दल असं म्हटलं जातं की, मेहंदीचा रंग जितका उजळेल असेल, वधूचा जोडीदार तिच्यावर जास्त प्रेम करेल. मेहंदीचा उजळदार रंग वधू आणि वरांसाठी वैवाहिक जीवनासाठी खूप भाग्यवान मानला जातो.
मेहंदी लावल्यानं काय होतं? असंही सांगितलं जातं की, लग्नाच्या वेळी वधू आणि वर दोघेही मनात खूप घाबरलेले असतात. स्वत:च्या लग्नावेळी काही वेगळीच भीती जाणवत असते, मेहंदीची नैसर्गिक गुणधर्म थंड असल्यामुळं ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. म्हणूनच वधू-वरांना मेंदी लावली जाते.
इतकेच नाही तर मेंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)