JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Money Vastu Tips: वास्तुशास्त्राचे हे नियम कायम ध्यानात ठेवा; धनहानी टळेल, नशीब दगा नाही देणार

Money Vastu Tips: वास्तुशास्त्राचे हे नियम कायम ध्यानात ठेवा; धनहानी टळेल, नशीब दगा नाही देणार

घर आणि ऑफिससाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत, या नियमांचे पालन करून पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्या दुर्दैवाचे कारण बनतात.

जाहिरात

वास्तुदोष घालवण्याचे उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 नोव्हेंबर : वास्तुशास्त्रात दिशा आणि नियमांना विशेष महत्त्व आहे. घर आणि ऑफिससाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत, या नियमांचे पालन करून पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. जाणूनबुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्या दुर्दैवाचे कारण बनतात. हे सर्व घडते कारण अनेकवेळा आपल्याला वास्तुशास्त्राचे ज्ञान नसते. या चुकांमुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि याचा परिणाम घराच्या सुख-समृद्धीवर होतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील काही वस्तू तिजोरी जवळ किंवा स्वयंपाकघरात ठेवायच्या नसतात. काही गोष्टी तशा ठेवल्या गेल्यास धनहानी होण्याची शक्यता वाढते. संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित वास्तुशास्त्राच्या काही नियमांबद्दल दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांनी दिलेली माहिती पाहुया. किचनमध्ये औषधे नको- स्वयंपाकघर हे वास्तुमधील महत्त्वाचे स्थान असते. स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णा वास करते. स्वयंपाकघरात कुटुंबातील सर्वांसाठी पोटभर अन्न तयार केलं जातं. मात्र, स्वयंपाकघरात औषध किंवा औषधाचा डबा वगैरे ठेवू नका. यामुळे वास्तुदोष होतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरातील सदस्यांच्या तब्येतीत सतत चढ-उतार होत राहतात. या गोष्टी बाथरूममध्ये ठेवू नका - बाथरूम वापरत नसाल तेव्हा त्याचं दार बंद असावं. वास्तुशास्त्रानुसार तुटलेली काच, तुटलेली चप्पल, ओले कपडे आणि रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवू नये. बाथरुममध्ये किमान एका बादलीत थोडं तरी पाणी भरलेले ठेवावं, छोट्या वाटणाऱ्या या गोष्टींमुळे वास्तुदोष होतो आणि या गोष्टींमुळे घर आणि ऑफिसमध्ये सतत पैशांची हानी होते.

या वस्तू तिजोरीजवळ ठेवू नका - घर किंवा ऑफिसमध्ये सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून तिजोरीत मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. तिजोरीत किंवा आजूबाजूला काही चुकीच्या गोष्टी ठेवल्यास पैशाच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार झाडू, खराब-खरकटी भांडी यासारख्या वस्तू तिजोरीजवळ ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि धनहानी होते. वाचा - Vastu Tips: कुठेही जमीन खरेदी करा, पण व्यवहार होण्याअगोदर या गोष्टी एकदा बघा

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या