जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vastu Tips: कुठेही जमीन खरेदी करा, पण व्यवहार होण्याअगोदर या गोष्टी एकदा बघा

Vastu Tips: कुठेही जमीन खरेदी करा, पण व्यवहार होण्याअगोदर या गोष्टी एकदा बघा

वास्तुशास्त्रानुसार जमीन खरेदी

वास्तुशास्त्रानुसार जमीन खरेदी

खूप मेहनत करून विकत घेतलेली जमीन काही वेळा माणसाच्या अडचणी वाढवते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी जमिनीची थोडी वेगळी तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी वास्तुशास्त्रात अनेक पद्धती सांगितल्या आहेत.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 नोव्हेंबर : एखाद्या चांगल्या मोक्याच्या ठिकाणी जमीन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण खूप मेहनत करून विकत घेतलेली जमीन काही वेळा माणसाच्या अडचणी वाढवते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी जमिनीची थोडी वेगळी तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी वास्तुशास्त्रात अनेक पद्धती सांगितल्या आहेत. माती आणि दिव्याचा उपयोग करून खरेदी करायची असलेली जमीन शुभ आहे की अशुभ हे ओळखता येईल. त्यासाठी काही टिप्स आज पाहुयात. मातीनुसार जमिनीची वैशिष्ट्ये पंडित रामचंद्र जोशी यांच्या म्हणण्यानुसार, त्या जमिनीतील माती तपासण्यासाठी प्लॉटच्या मधोमध एक हात लांब आणि रुंद आणि खोल खड्डा खणावा. नंतर सर्व खोदलेली माती परत त्याच खड्ड्यात भरावी. खड्डा भरून जर माती उरली तर ती जमीन संपत्ती वाढवणारी आहे. त्या मातीने खड्डा बरोबर समांतर भरला तर ती मध्यम आहे. मात्र, खड्डा भरण्यासाठी माती कमी पडल्यास जमीन अशुभ मानली जाते. याच पद्धतीने खड्डा खोदून त्यात पाणी ओतावे आणि लगेच खड्ड्याच्या उत्तर दिशेला शंभर पावले चालत जाऊन परत यावे. परत येईपर्यंत खड्ड्यात पाणी तितकेच राहिले तर ती जमीन सर्वोत्तम मानली जाते. जर पाणी थोडं कमी किंवा अर्धे झाले असेल तर ती जमीन मध्यम आहे आणि जर खूप कमी झाले असेल तर ती जमीन चांगल्या दर्जाची नाही. अशाच पद्धतीने संध्याकाळी खड्डा खणून पाणी ओतावे आणि सकाळी जमिनीची पाहणी करावी. खड्ड्यात पाणी उरले तर त्या ठिकाणी राहणे शुभ आहे, फक्त चिखल उरल्यास तेथील निवास मध्यम आणि भेगा दिसल्यास त्याचा वाईट परिणाम होतो. जमिनीत गहू, मूग, मोहरी इत्यादी बिया पेरूनही माती परीक्षण केले जाते. बी तीन रात्रीत उगवले तर जमीन चांगली, पाच रात्रीत उगवले तर मध्यम आणि सात रात्रीनंतर उगवले तर जमीन कमी दर्जाची आहे. चव आणि रंगानुसार माती परीक्षण वास्तुशास्त्रानुसार, जमिनीच्या मातीची चव, सुगंध आणि रंग देखील तिच्या मालकासाठी शुभ आणि अशुभ परिणामांची माहिती देतो. गोड चव असलेली मृदा ब्राह्मणांसाठी, तुरट चवीची क्षत्रियासाठी, आंबट चवीची वैश्य आणि कडू चवीची माती शूद्रांसाठी शुभ मानली जाते.

News18लोकमत
News18लोकमत

दिव्याने जमीन तपासणी पंडित जोशी यांच्या मते दिव्याद्वारेही जमीन परीक्षण करता येते. त्यासाठी एक हात खोल खड्डा खणून तो सर्व बाजूंनी पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर एका मातीच्या दिव्यात तूप भरून त्याला चार वातीचा दिवा लावा. नंतर तो त्या खड्ड्यात ठेवा. जर पूर्व दिशेचा दिवा जास्त वेळ जळत असेल तर ती जमीन ब्राह्मणासाठी शुभ मानली जाते. तसेच क्षत्रियासाठी उत्तर दिशेचा दिवा जास्त वेळ जळणे शुभ असते, वैश्यांसाठी पश्चिम दिशेचा दिवा आणि दक्षिण दिशेचा दिवा दीर्घकाळ प्रज्वलित राहिल्यास ती भूमी शूद्रांसाठी शुभ मानावी. हा दिवा चारही दिशांना तेवत राहिल्यास ती भूमी सर्व वर्णांसाठी शुभ मानावी. वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion , vastu
  • First Published :
जाहिरात
जाहिरात