तुळशीचे रोप नियम
मुंबई, 07 नोव्हेंबर : भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. दैवी गुणधर्मांसोबतच ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. त्यात अनेक अलौकिक आयुर्वेदिक शक्ती आहेत. सनातन धर्म मानणारे अनेक लोक आपल्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावतात, पण तुळशीचे काही नियम अनेकांना माहीत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार तुळस या पवित्र वनस्पतीभोवती काही वस्तू ठेवू नयेत. तुमच्या घरी तुळशी भोवती या गोष्टी असतील तर तुम्ही त्या ताबडतोब काढून घ्यायला हव्या. असे न केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शिवलिंग - तुळशीच्या जवळ भगवान शिव, गणेशाची मूर्ती किंवा शिवपरिवारातील कोणतीही गोष्ट असू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तुळशीच्या जवळ यापैकी काही आल्यास त्याचा नकारात्म प्रभाव दिसू लागतो. तुळशीच्या जवळ ठेवल्याने भोलेनाथ क्रोधित होतात, त्यामुळे भाविकांना अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते. जमिनीवर तुळस लावू नये - हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. हे रोप तुम्ही कधीही जमिनीत लावून त्याची पूजा करू नये. तुम्ही ते चौथरा करून किंवा विशिष्ट भांडे, स्टँडमध्येच लावावे. तसेच तळघरात कधीही तुळस लावण्याची चूक करू नका. तुळशीवर अंधार नको - तुळशीचे रोप मोकळ्या हवेशीर आणि स्वच्छ ठिकाणी लावावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. या वनस्पतीभोवती कधीही अंधार नसावा. तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला अंधार असेल तर ते तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरेल आणि आपत्तीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
गच्चीवर तुळस लावू नये - घराच्या छतावर तुळशीचे रोप शक्यतो कधीही लावू नये. असे केल्याने झाडाची काळजी घेतली जात नाही आणि तुळशीच्या रोपाची सकारात्मक ऊर्जाही संपते. याशिवाय घराच्या छतावर या वनस्पतीची लागवड केल्याने तीव्र ऊन, वादळ, पाऊस आणि थंडीची भीती असते कारण या ऋतूंमध्ये रोप अकाली सुकते आणि तुळशीचे रोप अकाली सुकणे शुभ मानले जात नाही. ज्याचे नुकसान संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागत आहे. हे वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)