JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ashadhi Ekadashi: देहूत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नेटके नियोजन; अशी केलीय व्यवस्था

Ashadhi Ekadashi: देहूत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नेटके नियोजन; अशी केलीय व्यवस्था

प्रथमच देहूतील नगरसेवक यांच्या माध्यमातून येथील स्थानिक नागरिकांना पांढरे झेंडे देण्यात आलेत, वारकऱ्यांची सेवा करण्याची भावना असेल त्यांनी तो आपल्या घरावर लावायचा. त्यामुळे श्रीक्षेत्र देहूत यंदाच्या वारीत सुंदरता, स्वच्छता, नेटके नियोजन दिसून येत आहे.

जाहिरात

पालखीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी काठाची स्वच्छता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 09 जून : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याची पूर्ण तयारी देहू नगर पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. गेली पंधरा दिवस हवेली अपर तहसीलदार अर्चना निकम आणि देहू नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी देहूनगरीचे रुपडं पालटले आहे. यंदाची निर्मलवारी या नावाला शोभेल असा देहूचा कायापालट करण्यात आला असल्याचे चित्र आहे. तसेच येथे येणारा वारकरी धन्य झाल्याशिवाय राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. इंद्रायणी नदीत वारकरी स्नान करतात, त्यासाठी नदीत पाठबंधारे खात्यांकडून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच नदीतील जलपर्णी हद्दपार करण्यात आली आणि घाटाची साफसफाई करण्यात आलीय आहे.

संबंधित बातम्या

देहूत चांगली स्वच्छता राहण्याचे नियोजन केले गेले आहे. यासाठी एक हजार शौचालये व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था केली आहे. यावेळेस प्रथमच देहूतील नगरसेवक यांच्या माध्यमातून येथील स्थानिक नागरिकांना पांढरे झेंडे देण्यात आलेत, वारकऱ्यांची सेवा करण्याची भावना असेल त्यांनी तो आपल्या घरावर लावायचा. त्यामुळे श्रीक्षेत्र देहूत यंदाच्या वारीत सुंदरता, स्वच्छता, नेटके नियोजन दिसून येत आहे. जूनमध्ये या 5 राशींवर बुध मेहरबान! संपत्ती वाढेल, नोकरी-व्यवसायात लाभाचे योग तीर्थक्षेत्र देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या 06 कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडा वर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या