मुंबई, 27 नोव्हेंबर : सध्याच्या काळात प्रामाणिक, एकनिष्ट लोक खूप कमी पाहायला मिळतात. कोणावर विश्वास ठेवणं ही खूप कठीण झालय. एखाद्या व्यक्तीला आपण 100 % नाही तरी काही अंशी अंकशास्त्राच्या माध्यमातून ओळखू शकतो. जर तुमच्या जन्म दिवसाची बेरीज 9 येत असेल म्हणजेच तुमचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 9,18,27 या तारखेला येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. या मुली असतात खूपच लाजाळू; बुद्धीचं नाही तर मनाचं ऐकतात! समजा जातकाचा जन्मदिनांक हा 18 मे 1991 आहे तर 11 या दिवसाची एक अंकी बेरीज म्हणजे या जातकाचा मूल्यांक होय. 9 हा मूल्यांक 18 = 1+8 =9 9 या अंकाचा ग्रह मंगल आहे . जाऊन घेऊयात 9 मूल्यांकाच्या लोकांची गुणवैशिष्टये: आक्रमक स्वभावाची असतात मूल्यांक 9 चे जातक. या तडपदार व्यक्ति असतात. ध्येय पुरती करणारे असतात हे लोक. प्रचंड शक्ति असणारे असतात. पटकन राग येणारे असतात. पराभवाला न घाबरणारे असतात. त्यांच्या बरोबर कोणीच यांच्यासोबत वादविवादात टिकाव धरू शकत नाही. भांडणाला न घाबरणारे असतात. सर्वांचे ऐकतात आणि स्वताच्या मनाचे करतात. अध्यात्म प्रिय असतात. क्षमाशील असतात. चंचल स्वभावाचे हे लोक असतात. यांचा सामाजिक संपर्क यांचा जास्त असतो. यांचा आवाज खूप छान असतो . प्रेमासाठी काहीही करू शकतात . रागात कोणी बोललेल यांना बिलकुल सहन होत नाही. खूप उतावळे असतात .९ मूल्यांकाचे लोक धोकेबाज नसतात. हे लोक वकील,डॉक्टर ,ज्योतिष ,सिविल सर्विस या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतात. यांना ताप व पोटाचे विकार जास्त असतात. यांनी हनुमान चाळिसा रोज वाचली पाहिजेल. यांना मंगळवार उपवास करणे लाभ कारक ठरू शकते . 9 मूल्यांकाचा शुभ अंक - 1,3,5,6,9 अशुभ अंक - 4,8,2 शुभ वार - मंगळवार ,गुरुवार,शुक्रवार अशुभ वार - शनिवार,बुधवार शुभ रंग - काळा ,लाल,हिरवा,सफेद. अशुभ रंग - कोणताच नाही. विकार – ताप, मूळव्याध. लाभकारी रत्ना - पोवळा. उपासना – गणपती उपासना ,हनुमानचाळीसा वाचणे . मूल्यांक 9 चे प्रसिद्ध व्यक्ति - अक्षय कुमार, सलमान खान, सोनिया गांधी. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)