JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Guru Purnima 2023 : कुर्ल्यात आहे पुरातन दत्त मंदिर, गुरुपौर्णिमेला असतात खास कार्यक्रम

Guru Purnima 2023 : कुर्ल्यात आहे पुरातन दत्त मंदिर, गुरुपौर्णिमेला असतात खास कार्यक्रम

कुर्ला परिसरात श्री सर्वेश्वर महादेव मंदिर मार्गावर दत्त महाराजांचं फार जुन मंदिर आहे. गुरुपौर्णिमेनिमीत्त या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 2 जुलै: श्री दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पूजलं जाणारं दैवत आहे. महाराष्ट्रात दत्त भक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये दिसतात. देशाच्या इतरही अनेक भागांमध्ये श्री दत्तगुरूंची आराधना केली जाते आणि मंदिरही आहेत. मात्र मुंबईतील कुर्ला परिसरात श्री सर्वेश्वर महादेव मंदिर मार्गावर श्री दत्ताचं फार जुनं मंदिर आहे. गुरुपौर्णिमेनिमीत्त या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असता त. 88 वर्षे जुनं मंदिर कुर्ला परिसरात अनेक गिरणी कामगार वास्तव्यास राहत होते. त्याकाळी कुर्ल्यातील स्वदेशी मिल जवळ असल्या कारणांमुळे गिरणी कामगार कुर्ल्यातील ताकियावार्ड परिसरात मोठ्या संख्येने राहत होते. याच भागात अनेक जुनी मंदिरे आहेत. त्यातीलच एक गिरणी कामगार आणि स्थानिकांचं श्रध्दास्थान असलेलं दत्तगुरु लेन येथील दत्त मंदिर. कुर्ल्यातील श्री दत्त मंदिराची स्थापना ही 1935 साली झाली. स्थापनेपासून आज पर्यंत तीन वेळेस मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सध्या भव्य दिव्य असं मंदिर असून मोठी आसन व्यवस्था, सभागृह, नवनवीन तंत्रचा वापर करण्यात आला आहे.

गुरुपौर्णिमेनिमीत्त खास कार्यक्रम दत्तगुरु सेवा मंडळ येथील या दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमीत्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या दिवशी मंदिरात मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. 88 वर्ष जुन्या या दत्त मंदिरात मुंबईतील गिरणी कामगार, कुर्ल्यातील ग्रामस्थ, दत्त महाराजांचे भाविक दर्शनासाठी दिवस भर येत असतात. येणाऱ्या भाविकांसाठी तीर्थप्रसाद व भांडाऱ्याचे आयोजन करण्यात येतं. Guru Purnima 2023 : गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग? पाहा प्रत्येक राशीचं भविष्य दत्त मंदिराची रचना दत्त मंदिराची रचना भव्य दिव्य आहे. मंदिराच्या वरच्या बाजूस कळस असून या कळसावर विवध देवी देवतांचे शिल्प साकारण्यात आले आहेत. मंदिराच्या आतील बाजूस प्रवेश द्वारावर देखील शिल्प काढण्यात आले आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस गणरायाची सुबक अशी लहान मूर्ती बसविण्यात आली आहे. तर आतल्या गाभाऱ्यात श्री दत्ताची 4 फूट उंच संगमरवरी दगडातील मूर्ती आहे. महाराजांच्या समोर पादुका ठेवण्यात आल्या आहेत. उजव्या बाजूला पवन पुत्र हनुमान तर डाव्या बाजूस महादेवाची पिंड ठेवण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या सभागृह मोठे असून 500 च्या जवळ पास भाविक एकावेळी उभे राहू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे कार्यक्रम मंदिरात होतात साजरे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, कोजागिरी पौर्णिमा, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. असं मंदिराचे कार्याध्यक्ष सुनील भालगरे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या