जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Guru Purnima 2023 : गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग? पाहा प्रत्येक राशीचं भविष्य

Guru Purnima 2023 : गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग? पाहा प्रत्येक राशीचं भविष्य

Guru Purnima 2023 : गुरूपौर्णिमेच्या दिवशी कुणाला आहे समृद्धीचा योग? पाहा प्रत्येक राशीचं भविष्य

तुमच्या राशीसाठी यंदाची गुरुपौर्णिमा कशी आहे? याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिलीय.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 1 जुलै : आपल्या देशात गुरूला मोठं महत्त्व आहे.गुरू आपल्याला ज्ञानाने प्रकाश देतात आणि अंधारातून प्रकाशाकडे नेतात. त्यांचा सन्मान करणारा उत्सव म्हणजे गुरूपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरूपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदा सोमवारी 3 जुलै रोजी गुरूपौर्णिमा आहे. ही गुरूपौर्णिमा कोणत्या राशीसाठी कशी आहे याबाबत पुण्यातील ज्योतिषी सावनी राजपाठक यांनी माहिती दिली आहे. मेष - मेष राशीच्या लोकांना गुरु प्रथम स्थानात आहे , संततीच्या विषयक शुभघटना घडतील, धार्मिक कार्यात यश मिळेल आणि विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. समाधानकारक दिनमान राहील वृषभ - वृषभ राशीच्या लोकांना १२ व्या स्थानात गुरु आहे , परदेश गमनासाठी योग्य काळ , वाहन खरेदी ,घर खरेदी विषयक मार्ग मोकळे होतील ,खर्च वाढेल.तब्येतीची काळजी घ्यावी . मिथुन-मिथुन राशीच्या लोकांना लाभस्थानात गुरु आहे , पती पत्नी मधील दुरावे नष्ट होतील , सामंजस्य वाढेल, धार्मिक कार्यात यश मिळेल . पत्नीची साथ मिळेल कर्क - कर्क राशीच्या  10 व्या स्थानात गुरु आहे , व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक नियोजन होईल , व्यवसायाच्या नव्या दिशा दिसतील , धार्मिक वातावरण घरात राहील.

News18लोकमत
News18लोकमत

सिंह - सिंह राशीच्या लोकांना अत्यंत शुभ दिवस आहे , हातून दानधर्म होईल ,जेष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल ,गुरुकृपा होईल , परदेशात योग्य आहेत. कन्या - कन्या राशीच्या लोकांना गुरु आठव्या स्थानात असल्याने कमी बळाचा असणार आहे . आजच्या दिवशी या लोकांनी दान आणि जप करावा . परदेश गमनासाठी मात्र शुभकाळ आहे . तुळ - तुळ राशीच्या लोकांना सातव्या स्थानात गुरु आहे. विवाह इच्छुकांचे विवाह होतील , नवरा बायकोचे संबंध सुधारतील ,जोडीदाराची साथ मिळेल . रखडलेली कामं मार्गी लागतील . वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांना सहाव्या स्थानात गुरु येतो. हाती घेतलेली काम मार्गी लागतील ,व्यवसायाच्या दृष्टीने शुभफळ मिळेल , या दिवशी दान करावं. गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर करा ‘या’ गोष्टी, आयुष्यात सर्वार्थानं होईल उन्नती, Video धनु रास - धनु राशीच्या लोकांचा अत्यंत शुभ असणारा पंचम स्थानातील गुरु येतो . दानधर्म ,गुरुची सेवा फलदायी ठरेल . आजची साधना उद्या फलदायी ठरेल ,धार्मिक कार्यात रस येईल . मेहनतीस फळ येईल. मकर रास - मकर राशीच्या लोकांना चौथ्या स्थानावर गुरु आहे.घरामध्ये शुभकार्य होतील. धार्मिक वातावरण असेल परदेशगमनाचे योग , बढतीचे योग असतील . कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांचा तृतीय स्थानावर गुरु आहे . या लोकांच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल , यश मिळेल त्यांच्या विचाराला ज्ञानाची जोड मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह होतील . मीन रास - मीन राशीच्या लोकांना गुरु धन स्थानामध्ये आहे. पैशाची बचत होईल ,आर्थिक नियोजन होईल , रखडलेली कामं मार्गी लागतील.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात