JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / जिलब्या मारुती गणपती हे नाव कसं पडलं? तुम्हाला माहिती आहे का इतिहास? Video

जिलब्या मारुती गणपती हे नाव कसं पडलं? तुम्हाला माहिती आहे का इतिहास? Video

पुण्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यात यामधील काही मंदिरांची नावं ही आश्चर्यचकित करणारी आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 25 जुलै : विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वारशाच्या अनेक वैभवशाली खुणाही पाहायला मिळतात. पुण्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. यात यामधील काही मंदिरांची नावं ही आश्चर्यचकित करणारी आहेत. ही नावं असण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. यामधील जिलब्या मारुती नावामागची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. इतिहास संशोधक संजय सोनावणे यांनी याबाबतची माहिती दिलीय. कसं पडलं नाव? पुण्याची गजबजलेली बाजारपेठ असलेल्या मंडईत जिलब्या मारुतीचं मंदिर आहे. शनिपारकडून मंडईकडे जाताना एक मारूतीचे आणि गणपतीचे मंदिर दिसते ते हेच! शनिपार महात्मा फुले मंडई तुळशीबाग यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी हे मंडळ आहे या मंडळाची स्थापना 1954 साली झाली. जिलब्या गणपतीचे डाेळे काचेचे असल्याने मूर्तीत जिवंतपणा जाणवतो. ही मूर्ती ४० वर्षे जुनी आहे.

या भागात पूर्वी एक हलवाईचे दुकान होते. तो हलवाई नेहमी या गणपती आणि मारुतीला जिलब्यांचा हार अर्पण करत असत. त्यावरून येथील मारूतीला जिलब्या असे म्हटले जाते. या मंदिरातील मंडळाच्या गणरायाला आजही गणेशोत्सवात जिलब्यांचा नैवैद्य दाखविण्यात येतो. जिलब्या मारूती मंडळ हे प्रमुख गणपती पैकी एक आहे तसेच शहराच्या मध्यभागी असलेले एक नावाजलेले मंडळ आहे. एका भावुक क्षणी झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना! पाहा माहिती नसलेला इतिहास या मारूतीवरून गणपती मंडळाचे नावही ‘जिलब्या मारूती मंडळ’ असे पडले, अशी माहिती इतिहास अभ्यासक संजय सोनावणे यांनी दिली. येथे दरवर्षी बाप्पांना जिलब्यांचा प्रसाद दाखविला जातो. मिरवणुकीतही मंडळाकडून जिलब्या वाटल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या