जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / एका भावुक क्षणी झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना! पाहा माहिती नसलेला इतिहास

एका भावुक क्षणी झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना! पाहा माहिती नसलेला इतिहास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या स्थापनेचा इतिहास माहिती आहे?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 21 जुलै : पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची एकदा तरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्याची इच्छा असते. पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहेत. या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाईच्या देखाव्याचं सर्वांनाच आकर्षण असतं. गणपतीची दहा दिवस रोज लाखो भक्त दर्शन घेतात. या गणपतीच्या स्थापनेचा मोठा रंजक इतिहास आहे. कधी झाली स्थापना? ही गोष्ट आहे 1893 सालची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत होती. त्यावेळी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ यांच्या मुलाचं निधन झालं. त्यामुळे दु:खात असलेल्या दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचं त्यांचे गुरू श्री माधवनाथ महाराजांनी सांत्वन केलं. त्यांनीच श्री दत्तमहाराज आणि गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याचा सल्ला दिला.

News18लोकमत
News18लोकमत

‘मुलं आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करतात तसंच ही दोन दैवतं तुमचं नाव उज्ज्वल करतात, असं भाकित माधवमहाराज यांनी व्यक्त केलं. त्यानंतर दगडूशेठ यांनी दत्त महाराजांची संगमरवरी तर गणपतीची मातीची मूर्ती बनवली होती. या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली होती. आज पुण्यातील गणपतींच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नाव आघाडीवर आहे. मूर्ती बनवण्यासाठी किती खर्च? दगडूशेठ हलवाई यांची दुसरी मूर्ती 1896 साली तयार करण्यात आली. त्या मुर्तीचा उत्सव  होऊ लागला. याच काळात दगडूशेठ यांचं निधन झालं. त्यानंतरही त्या परिसरातील नागरिक तसंच कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरुच ठेवली. हा गणपती त्याकाळी  कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहुलीचा हौद, सार्वजनिक गणपती अशा नावाने प्रचलित होता. महाराष्ट्रातलं असं हे मंदिर इथं चिमुकल्यांना झोळीत फेकलं जातं, नेमकं काय आहे कारण? VIDEO ‘1967 साली या गणपतीचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. 1896 साली तयार केलेल्या या मुर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. यानंतर नवीन मूर्ती बनवण्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार नागेश शिल्पी यांना पाचारण केले गेले. नमुना म्हणून एक लहान मूर्ती बनवण्यात आली. यानंतर बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टरचा वापर करून पडद्यावरून कार्यकर्त्यांना ही मूर्ती दाखवली. आधीच्या मुर्तीशी ही मूर्ती मिळत आहे याची खात्री करत सर्वांच्या सहमतीनं नवीन मूर्ती तयार केली गेली. ही मूर्ती बनवण्यासाठी त्याकाळी 1125 रुपये (एक हजार एकशे पंचवीस रुपये) इतका खर्च आला होता,’ अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांनी दिलीये . 1984 मध्ये मुर्तीची मंदिरात स्थापना तर 2002 साली भव्य मंदिरानंतर  गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर गणपतीची मंदिरात स्थापना करण्यात आली. भाविकांसाठी मंदिर अपुरे पडू लागल्यानं हे मंदिर उभारण्यात आलं. कोणत्या राशीला आहे पुष्कराजचा फायदा? ‘या’ राशीनं चुकूनही वापरु नये रत्न! ट्रस्टची सामाजिक कामं पुणे जिल्ह्यातल्या पिगोरीमध्ये (ता. पुरंदर) या ट्रस्टकडून जलसंधारणाची कामं करण्यात आली आहेत. ससून हॉस्पिटलमधील पेशंट्सना  भोजनसेवाही दिली जात आहे. कोंढव्यात देवदासी आणि अनौरस मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रमही चालवण्यात येत आहे.  गणेशोत्सवादरम्यान हजारो महिलांच्या सहभागानं होणारा अथर्वशीर्ष उपक्रम जगप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात ट्र्स्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली. मंदिरातील आरतीची वेळ दगडूशेठ गणपती मंदिर हे रोज सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सर्वांसाठी खुलं असतं. मंदिरात दिवसभरातून चार वेळा आरती होते. सकाळी 7.30 ते 7.45 - सुप्रभातम आरती 1.30 ते 2.00 - नैवेद्यम आरती 3.00 ते 3.15 - मध्यान्ह आरती 8.00 ते 8.15 - महामंगल आरती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात