JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / काय सांगता? 'या' शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढतो? त्वचारोगही नष्ट होतात...

काय सांगता? 'या' शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढतो? त्वचारोगही नष्ट होतात...

महादेवाला अभिषेक करण्यासाठी दररोज शेकडो भाविक याठिकाणी येत असतात. श्रावण महिना आणि शिवरात्रीच्या काळात तर भाविकांची संख्या प्रचंड वाढते.

जाहिरात

पांडवांनी वनवासात असताना या मंदिरात पूजा केली होती, असं मानलं जातं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गौरव सिंह, प्रतिनिधी भोजपूर, 21 जून : बिहारला धार्मिक भूमी म्हटलं जातं. या भूमीत अनेक प्राचीन मंदिरं आहेत, ज्यांची स्वतःची एक आख्यायिका आहे आणि अनेक मंदिरांचं वर्णन पुराणातही आढळतं. इथे महादेवांचंही एक चमत्कारिक मंदिर आहे. चमत्कारिक अशासाठी, कारण या मंदिरातील शिवलिंगाची दरवर्षी वाढ होते. हा एक अद्भुत चमत्कारच मानला जातो. शिवाय येथे येणाऱ्या भाविकांना त्वचारोगापासून कायमची मुक्ती मिळते. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरात वसलेलं हे बुढवा महादेव मंदिर भारतातील प्राचीन शिव मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा इतिहास इतका जुना आहे की आजच्या पिढीतील कोणालाच त्याबाबत काही ठाऊक नाही. इतिहासकारांनाही त्याबाबत ठोस माहिती कळू शकलेली नाही. मात्र हे मंदिर महाभारत काळातलं असावं, अशी एक मान्यता आहे.

खरंतर पांडवांनी वनवासात असताना या मंदिरात पूजा केली होती, असं मानलं जातं. शिवाय राजा भोजनेही या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याचं बोललं जातं. त्यामुळेच या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचबरोबर हे शिवलिंग ज्या दगडापासून निर्माण झालं, तेसुद्धा अत्यंत प्राचीन असून आता आढळत नाही आणि त्याची दरवर्षी वाढ होते, असं म्हटलं जातं. स्वतः मंदिराच्या पुजाऱ्यांनीच हा दावा केला आहे. Weather Update: पुढील 4 दिवस मुंबईसह या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा प्राचीन असल्यामुळे खूप वर्षांपूर्वीचं या अर्थाने या मंदिराला ‘बुढवा’ असं नाव पडलं. मंदिराचे पुजारी महंत अजित मिश्रा सांगतात, ‘आमच्या अनेक पिढ्यांनी या मंदिरात सेवा दिली. सध्या मी पूजा करतो. मला स्वतःला जाणवलं की, जेव्हापासून मी याठिकाणी आलो तेव्हापासून शिवलिंगाचा आकार वाढला आहे’, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, महादेवाला अभिषेक करण्यासाठी दररोज शेकडो भाविक याठिकाणी येत असतात. श्रावण महिना आणि शिवरात्रीच्या काळात तर भाविकांची संख्या प्रचंड वाढते. महत्त्वाचं म्हणजे या शिवलिंगावर वाहिलेलं पाणी प्यायल्यास त्वचेसंबंधित सर्व रोग बरे होतात. विशेषतः त्वचेवरील पांढरे डाग नष्ट होतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या