मुंबई, 23 ऑक्टोबर : रविवार हा सूर्य देवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. सूर्य देवाला नऊ ग्रहांचा राजा, आरोग्य, बुद्धिमत्ता, कीर्ती आणि समृद्धीची देवता म्हटले जाते. असे म्हणतात की कलियुगात सूर्यदेव हा एकमेव असा देवता आहे, जो प्रत्यक्षपणे दिसतो. सूर्यदेवाची पूजा करून अर्घ्य दिल्याने मनुष्याला अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. यामुळेच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त सर्व प्रकारचे उपाय करतात. सूर्य अष्टकम स्तोत्राच्या पठणाने सूर्य देव आपल्यावर लवकरच प्रसन्न होतात, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार जो व्यक्ती रविवारी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ करतो, त्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारची संकटे दूर राहतात. दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंग यांनी सूर्य अष्टकम स्तोत्र आणि या स्तोत्राच्या पठणाची पद्धत सांगितली आहे. सूर्य अष्टकम स्तोत्र आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर । दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते॥1॥ सप्ताश्व रथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम् । श्वेत पद्माधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥2॥ लोहितं रथमारूढं सर्वलोक पितामहम् । महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥3॥ त्रैगुण्यश्च महाशूरं ब्रह्माविष्णु महेश्वरम् । महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥4॥ बृहितं तेजः पुञ्ज च वायु आकाशमेव च । प्रभुत्वं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥5॥ बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम् । एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥6॥ तं सूर्यं लोककर्तारं महा तेजः प्रदीपनम् । महापाप हरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥7॥ तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानप्रकाशमोक्षदम् । महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥8॥ इति श्रीशिवप्रोक्तं सूर्याष्टकं सम्पूर्णम् । सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम् । अपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत् ॥ अमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने । सप्तजन्मभवेत् रोगि जन्मजन्म दरिद्रता ॥ स्त्री-तैल-मधु-मांसानि ये त्यजन्ति रवेर्दिने । न व्याधि शोक दारिद्र्यं सूर्य लोकं च गच्छति ॥
या पद्धतीने सूर्य अष्टकम स्तोत्राचा करा पाठ - हा स्तोत्र तुम्ही रविवारी किंवा नियमितपणे म्हणू शकता. परंतु, सूर्यअष्टकम स्तोत्र म्हणण्यासाठी रविवारीच सुरुवात करावी. सूर्योदयाच्या वेळी त्याचा पाठ केल्यास विशेष लाभ होतो. रविवारी सूर्य अष्टकम स्तोत्राचा पाठ करणाऱ्या व्यक्तीने मांस आणि मद्य सेवनापासून दूर राहावे. तसेच या दिवशी मीठ सोडून सात्विक आहार घ्यावा. हे वाचा - दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती कमजोर असते. त्यांनी सूर्यअष्टकम् स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्य अष्टकम स्तोत्राचे पठण करणे उत्तम.