JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Sunday Remedies: रविवारी सायंकाळी करा हे ज्योतिषीय उपाय, पूर्ण आठवडाभर कामात फरक अनुभवाल

Sunday Remedies: रविवारी सायंकाळी करा हे ज्योतिषीय उपाय, पूर्ण आठवडाभर कामात फरक अनुभवाल

Sunday upay: कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी रविवारी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात, ज्यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतील आणि कामे नीट मार्गी लागतील. जाणून घेऊया रविवारी कोणते उपाय करावेत.

जाहिरात

रविवारी सायंकाळी करण्याचे उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जुलै : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित मानला जातो. रविवार हा सूर्यदेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. कुंडलीत रवि अशक्त असेल तर तुमच्या प्रगतीत बाधा येईल आणि तुम्हाला ताण-तणावासोबतच जीवनात अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी रविवारी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात, ज्यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतील आणि कामे नीट मार्गी लागतील. जाणून घेऊया रविवारी कोणते उपाय करावेत. रविवारी हा उपाय करा - रविवारी आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. यासोबत ‘ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः’ या मंत्राचा जप करावा. - शास्त्रानुसार रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार मुखी दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात ऐश्वर्य येते. जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर त्यासाठी हा उपाय खूप उपयोगी ठरेल.

- तुमच्या कुंडलीत सूर्य बलवान होण्यासाठी तुम्ही रविवारी एखाद्याला गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करावे. यामुळे तुम्हाला यश मिळेल. - जर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर रविवारी वटवृक्षाच्या तुटून खाली पडलेल्या तुमची इच्छा लिहा आणि नंतर ते पान वाहत्या पाण्यात सोडून द्या. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास - रविवारी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला, असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर विशेष आशीर्वाद देईल. - रविवारी 3 झाडू खरेदी करावेत आणि सोमवारी हे झाडू मंदिरात दान करा, तुमचे नशीब उजळेल आणि तुमचे वाईट कर्म दूर होतील. - सूर्याच्या कृपेसाठी रविवारी स्वतःच्या हाताने गाईला तूप आणि गुळाची रोटी खाऊ घाला. असे केल्याने घरात धन प्राप्ती होऊ शकते. श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या