JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / शिव-शंकराची राहील कुटुंबावर कायम कृपादृष्टी; सोमवारी पूजा करताना हे 5 उपाय करा

शिव-शंकराची राहील कुटुंबावर कायम कृपादृष्टी; सोमवारी पूजा करताना हे 5 उपाय करा

भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. सोमवारी शिव-शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय पाहुया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 नोव्हेंबर : भगवान शिव-शंकराला जगाचा निर्माता मानले जाते. महादेवाच्या भक्तांची संख्या मोठी आहे. भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी लोक सतत विविध प्रयत्न करतात आणि त्यांना प्रसन्न करून आशीर्वाद मिळवतात. भगवान भोलेनाथ हे असे दैवत आहे, जे आपल्या भक्तांच्या अल्प भक्तीनेही प्रसन्न होतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी सोमवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी (सोमवार) काही साधे उपाय करून व्यक्ती आपल्या आयुष्यातील संकटांपासून मुक्त होऊ शकतो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सोमवारी करण्याचे सांगितलेले उपाय जाणून घेऊया. 1. घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी - धार्मिक श्रद्धेनुसार, जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणायची असेल, तर दर सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर त्यांची आरती करावी. या उपायाने तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. 2. इच्छित वरदान मिळविण्यासाठी - तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायची असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दूध, साखर, पांढरे कपडे आणि दही दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन इच्छित वरदान देतात, असे मानले जाते. 3. आर्थिक संकट टाळण्यासाठी - तुम्ही कष्ट करत असाल आणि त्यानंतरही तुम्हाला मेहनतीचे फळ मिळत नसेल, त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल तर सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवरक्षा स्तोत्राचे पठण करा. या उपायाने तुम्हाला फायदा दिसून येईल. 4. भोलेनाथाची कृपा राहण्यासाठी - भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमवारी महादेवाला दूध, धतुरा, आक, गंगाजल, चंदन, अक्षता आणि बेलपत्र अर्पण करावे. याने महादेव प्रसन्न होऊन भक्तांना शुभ आशीर्वाद देतात.

5. चंद्रदोष कमी करण्यासाठी - जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रदोष कमी करण्यासाठी त्या व्यक्तीने पांढरे वस्त्र परिधान करावे आणि घराबाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावूनच बाहेर पडावे. हे वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या