JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Somvati Amavasya: सोमवती अमावस्येला या सोप्या उपायांनी बदलेल नशीब, अडचणी होतील दूर

Somvati Amavasya: सोमवती अमावस्येला या सोप्या उपायांनी बदलेल नशीब, अडचणी होतील दूर

somvati amavasya 2023 : सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.

जाहिरात

सोमवती दर्श अमावस्या 2023

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : यंदा 17 जुलैला आषाढ महिन्यातील सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे, त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करावा. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता. सोमवती अमावस्येला तुळशीच्या सोप्या उपायाने अडचणी दूर करता येते. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी सोमवती अमावस्येला अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. सोमवती अमावस्या 2023 साठी ज्योतिषीय उपाय 1. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. तुळशीवर पाणी शिंपडा आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करा. या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धन-धान्य प्राप्त होते, असे मानले जाते.

2. सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करा. सुरुवातीला 8 परिक्रमेमध्ये कच्चे सूत 8 वेळा गुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा. पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करा. विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घर धनधान्याने भरले जाईल.

3. नोकरीसाठी उपाय - सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा. हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत 7 वेळा उतरवा. नंतर त्याचे 4 भाग करा आणि चौरस्त्यावर 4 दिशेने फेकून द्या. असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. Pitradosh: घरात पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी ही दिशा योग्य; नाही होणार पितृदोषाचा त्रास 4. पैसे मिळविण्याचा मार्ग - सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यात लाल रंगाची वात घाला आणि त्यात केशर टाका. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी कृपेने माणसाला धन-समृद्धी मिळते. 5. दुःखांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय - सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी. नंतर काळ्या मुंग्यांना खायला घाला. असे केल्याने पुण्य प्राप्त होते, दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते. सोमवती अमावस्या - सोमवती अमावस्या सुरू होण्याची तारीख: 16 जुलै, रविवार, रात्री 10:08 वा. सोमवती अमावस्या समाप्ती तारीख: 18 जुलै, मंगळवार, 12:01 AM सोमवती अमावस्या शुभ वेळ: 17 जुलै, सकाळी 05:34 ते 07:17 पर्यंत श्रावण सुरू होताच राशीनुसार करा या गोष्टी; शंभू-महादेव अडचणींमध्ये दाखवतील मार्ग (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या