JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / तुळशी विवाहासोबतच आहे शनि प्रदोष व्रत; अपत्य प्राप्तीसाठी आज अशी करा उपासना

तुळशी विवाहासोबतच आहे शनि प्रदोष व्रत; अपत्य प्राप्तीसाठी आज अशी करा उपासना

शनि प्रदोष व्रत मुख्यत्वे अपत्य नसलेल्या लोकांसाठी किंवा ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, अशा लोकांनी हे व्रत ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार, शनि प्रदोष व्रत ठेवल्याने भगवान शंकराच्या कृपेने पुत्रप्राप्ती होते, असे मानले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 नोव्हेंबर : आज 05 नोव्हेंबर रोजी नोव्हेंबर महिन्यातील पहिला आणि कार्तिक महिन्यातील दुसरा शनि प्रदोष व्रत आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी व्रत करून भगवान शंकराची पूजा केली जाते. या दिवशी प्रदोष कालात म्हणजेच संध्याकाळी पूजा करण्यासाठी मुहूर्त असतो. प्रदोष व्रत केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात, असे मानले जाते. आज रात्री असला तरी शनि प्रदोष व्रतात रवि योग तयार होत आहे. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी शनि प्रदोष व्रताचा मुहूर्त आणि उपासना पद्धतीची माहिती दिली आहे. शनि प्रदोष व्रत 2022 मुहूर्त - कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीचा प्रारंभ: 05 नोव्हेंबर, शनिवार, संध्याकाळी 05.06 पासून कार्तिक शुक्ल त्रयोदशी तिथीची समाप्ती: 06 नोव्हेंबर, रविवार, दुपारी 04:28 वाजता शिवपूजेचा प्रदोष मुहूर्त: आज संध्याकाळी 05.33 ते रात्री 08.10 पर्यंत निशिता मुहूर्त: रात्री 11:39 ते रात्री 12.31 पर्यंत रवि योग: आज रात्री 11.56 ते उद्या सकाळी 06.37 पर्यंत आजचा अभिजित मुहूर्त: सकाळी 11.43 ते दुपारी 12.26 पर्यंत शनि प्रदोष व्रत कोणी करावे - शनि प्रदोष व्रत मुख्यत्वे अपत्य नसलेल्या लोकांसाठी किंवा ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, अशा लोकांनी हे व्रत ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार, शनि प्रदोष व्रत ठेवल्याने भगवान शंकराच्या कृपेने पुत्रप्राप्ती होते. तथापि, इतर लोकांनाही हे व्रत ठेवण्यास हरकत नाही, शिवशंकराची कृपा त्यांच्यावर राहील. शनि प्रदोष व्रत आणि उपासना पद्धत - 1. आज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर शनि प्रदोष व्रत आणि शिवपूजनाचा संकल्प करावा. 2. सकाळी पूजा करावी. मग दिवसभर फळांच्या आहारावर रहा. भगवान शिवाची भक्ती आणि भजनात वेळ घालवा. 3. प्रदोष काळातील शुभ मुहूर्तावर जवळच्या शिवमंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. 4. पूजा करताना प्रथम शिवलिंगावर गंगाजल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करा. त्यानंतर शिवलिंगावर चंदन, अक्षता, फुले, बेलपत्र, धतुरा, फुले, मध, धूप, शमीची पाने, नैवेद्य, साखर, धूप, दिवा इत्यादी अर्पण करा. या दरम्यान अखंड ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा.

5. पूजा केल्यानंतर तुम्ही शिव चालीसा, शिव मंत्र, शिव रक्षा स्तोत्र, शनि प्रदोष व्रत कथा इत्यादी वाचू आणि ऐकू शकता. त्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि त्याने भगवान शंकराची आरती करा. 6. पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. शिवाच्या कृपेने तुमचे रोग आणि दोषही दूर होतील. 7. पूजेनंतर प्रसाद वाटप करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून व्रत पूर्ण करावे. हे वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या