JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Sankashti Chaturthi Vrat: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला आहे विशेष महत्त्व; कथा आणि माहात्म्य जाणून घ्या

Sankashti Chaturthi Vrat: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला आहे विशेष महत्त्व; कथा आणि माहात्म्य जाणून घ्या

कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवर मात करायची असेल, तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले आहे. संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या भाविकांची संकटे दूर होतात, असे मानले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर : गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं, गणपती भाविकांची प्रत्येक संकटे, त्रास आणि अडथळे दूर करतो, म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवर मात करायची असेल, तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले आहे. संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या भाविकांची संकटे दूर होतात, असे मानले जाते. गुरुवारी आलेल्या संकष्टीच्या व्रताबद्दल अधिक जाणून घेऊया. संकष्टी उपवास - संकष्टी चतुर्थीचे व्रत दर महिन्याला पाळले जाते. पंडित रामचंद्र जोशी यांच्या मते, हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला केले जाते. गणेश पुराणात ब्रह्मदेवाने या व्रताचे महत्त्व सांगितले आहे. हे व्रत करणाऱ्यांची इच्छा पूर्ती होते, असे मानले जाते. उपवासाच्या विविध पद्धती - संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये सर्व महिन्यांच्या चतुर्थींचे महत्त्व सारखेच आहे, परंतु त्यांच्या विधींमध्ये फरक आहे. गणेश पुराणानुसार, श्रावण महिन्याच्या चतुर्थीच्या वेळी साधकाने मोदक खाऊन उपवास करावा, भाद्रपदाच्या चतुर्थीला दूध प्राशन करावे आणि अश्विन महिन्याच्या चतुर्थीला पूर्ण उपवास (निरंकार) करावा. याशिवाय कार्तिक महिन्यातील चतुर्थीला दूध खावे आणि मार्गशीर्षात निरंकार राहावे. पौष महिन्यात गोमूत्र, माघ महिन्यात तीळ आणि फाल्गुनमध्ये तूप-साखर, चैत्रात पंचगव्य, वैशाखमध्ये शतपत्र, जेष्ठात फक्त तूप आणि आषाढ महिन्याच्या चतुर्थीला फक्त मध.

कृतवीर्याला मुलगा झाला - गणेश पुराणातही संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यानुसार प्राचीन काळात कृतवीर्य नावाचा राजा अपत्य न झाल्यामुळे दुःखी होता. पुत्रकामेष्ठी यज्ञ आणि तपश्चर्या करूनही त्यांना बालसुख मिळाले नाही. यावर नारद ऋषींच्या सांगण्यावरून राजाच्या पूर्वजांनी ब्रह्माजींना उपाय विचारला. ब्रह्माजींनी यावर उपाय म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत सांगितले. त्यानंतर पितरांनी कृतवीर्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि संकष्टीचे व्रत पाळण्यासाठी सांगितले. असे केल्यावर राजा कृतवीर्याला पुत्रप्राप्ती झाली. तसेच गणेश पुराणात भृशुंडी ऋषींची कथा आहे. ज्यांचे आई-वडील कुंभीपाक नरकात यातना भोगत होते. ही माहिती नारदजींनी भृशुंडी ऋषींना सांगितल्यावर त्यांनी संकष्टी चतुर्थीला केलेल्या व्रताचे पुण्य फळ देऊन त्यांना नरकातून मुक्त केले. त्यामुळे हे व्रत प्रत्येक संकटातून मुक्ती मिळवून देणारे मानले जाते. हे वाचा -  Diwali 2022 : दिवाळीत पणती लावण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? कुठल्या दिशेला असावी ज्योत? (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या