मुंबई, 11 ऑक्टोबर : दसरा संपला, की दिवाळी जवळ आल्याची चाहूल लागते. आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वांत मोठा सण. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वसुबारसेपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ झाला असून, यंदा 26 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या दीपोत्सवासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. सुख-समृद्धीचे प्रतीक असलेला हा सण साजरा करत असताना घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार थोडी काळजी घेण्याची गरज आहे. ‘आज तक’ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या अमावास्येला सोमवारी म्हणजेच 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाईल. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात दीपप्रज्ज्वलनाचं विशेष महत्त्व आहे. तसंच घरात लक्ष्मी देवीच्या आगमनासाठी प्रत्येक जण घराला विद्युत रोषणाईसुद्धा करतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी देवीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी घरात कुठेही अंधार नसावा अन्यथा लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही, असं मानलं जातं. अशीच श्रद्धा दिवा लावण्याची पद्धत आणि घराला करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईसोबतसुद्धा जोडली आहे. घरात, अंगणात लावण्यात येणारे दिवे शास्त्रानुसार योग्य पद्धतीने न लावल्यास ते शुभ मानलं जात नाही.
Diwali 2022 : का साजरी केली जाते दिवाळी? जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्तदिवाळीच्या काळात घरात विद्युत रोषणाई करण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला कोणत्या रंगाची रोषणाई करावी हे समजून घ्या. घराची सजावट करताना रंगीबेरंगी लाइटिंगच्या माळा वापरल्या जात असल्या तरी या काळात रंगांची काळजी घेतली तर ते शुभ ठरतं.
पूर्व दिशेला लाल, पिवळा आणि केशरी प्रकाश पडेल, असं लायटिंग शुभ राहील. पश्चिम दिशेला गर्द पिवळा, केशरी आणि गुलाबी प्रकाश पडेल, असं लायटिंग करावं. उत्तर दिशेला निळा, पिवळा आणि हिरवा प्रकाश पडेल, असं लायटिंग करता येईल. पांढरा, जांभळा आणि लाल प्रकाश पडेल, असं लायटिंग दक्षिण दिशेला करावं. - दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करून कधीही दिवा लावू नये. कारण ते अशुभ आहे. दक्षिण दिशा यमाची असते. केवळ धनत्रयोदशीदिनी दक्षिणेला तोंड करून दिवा लावला जातो. त्याला यमदीपदान असं म्हणतात. - दिवाळीला शुद्ध तुपाचे दिवे लावल्यास घरात समृद्धी येते, असं मानलं जातं. - दिवे लावण्यासाठी कधीही सूर्यफुलाचं तेल वापरू नये. - दिव्याची वात इतकी लांब असावी की जेणेकरून ज्योत दिव्याच्या मध्यभागी जाणार नाही. - दिवे लावण्याची सुरुवात नेहमी देवघरातून करावी. - दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मी आणि गणेशाचं स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत.
Diwali 2022 : दिवाळीचा फटाक्यांशी संबंध कधी आणि कसा आला? फटाक्यांचा रंजक इतिहास- दिवाळीमध्ये महत्त्वाचं असणारं लक्ष्मीपूजन करताना घरात, अंगणात दीपप्रज्ज्वलन करताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. योग्य पद्धतीने दिवे लावल्यास फायदा होतो व लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.