JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Rang Panchami 2023: उधळा रंग, आज रंगपंचमी; धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथाही जाणून घ्या

Rang Panchami 2023: उधळा रंग, आज रंगपंचमी; धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथाही जाणून घ्या

धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवताही पृथ्वीवर येतात आणि सर्वसामान्यांसोबत रंग-गुलाल खेळतात. असे म्हटले जाते की, रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूला पिवळा रंग अर्पण करावा.

जाहिरात

रंगपंचमी 2023 धार्मिक महत्त्व

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मार्च : हिंदू धर्मात होळी हा सण वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. रंगपंचमी होळीच्या बरोबर 5 दिवसांनी खेळली जाते. यंदा रंगपंचमीचा सण आज (12 मार्च) रविवारी साजरा होत आहे. रंगपंचमीला श्री पंचमी किंवा देव पंचमी असेही म्हणतात. सनातन धर्मात रंगपंचमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी रंगपंचमीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि त्याच्याशी संबंधित पौराणिक कथा याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ. रंगपंचमी 2023 रंगपंचमीची सुरुवात: 11 मार्च, रात्री 10:06 वाजता (काल रात्रीपासून सुरू). रंगपंचमी तिथी पूर्ण: आज 12 मार्च, रात्री 10.02 वा. उदय तिथीनुसार, रंगपंचमीचा सण आज म्हणजेच 12 मार्च 2023 रोजी रविवारी साजरा केला जात आहे. रंगपंचमीचे महत्त्व काय? धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या सणाला एकमेकांवर रगं-गुलाल उधळण्याची परंपरा आहे. रंगपंचमीच्या दिवशी मित्र परिवार, नातेवाईक गुलाल आणि विविध रंगानी रंगपंचमी खेळतात. प्रत्येकजण आपापल्या परीने रंग-गुलाल उधळून हा दिवस साजरा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवताही पृथ्वीवर येतात आणि सर्वसामान्यांसोबत रंग-गुलाल खेळतात. असे म्हटले जाते की, रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूला पिवळा रंग अर्पण करावा. याशिवाय या दिवशी देवतांना विशेष प्रकारचा नैवेद्य अर्पण करावा. रंगपंचमीची आख्यायिका - धार्मिक कथेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने राधासोबत रंग खेळले होते. त्यामुळेच या दिवशी विधीनंतर राधा-कृष्णावर गुलालाची उधळण केली जाते आणि त्यानंतर रंग-गुलालाने रंगपंचमी खेळण्याची परंपरा प्रचलित आहे.

दुसर्‍या आख्यायिकेनुसार होळाष्टकाच्या दिवशी कामदेवाने भगवान शंकराची तपश्चर्या मोडली, त्यामुळे भोलेनाथांनी क्रोधित होऊन कामदेवाला जाळून टाकले. यामुळे देवलोकातील सर्वजण दुःखी झाले, परंतु कामदेवची पत्नी देवी रती आणि देवतांच्या प्रार्थनेवर भगवान शिवांनी कामदेवला पुन्हा जिवंत करण्याचे आश्वासन दिले, तेव्हा सर्व देवी-देवता आनंदी झाले आणि त्यांनी रंगोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पंचमी तिथी रंगपंचमी म्हणून साजरी केली जाऊ लागली. हे वाचा -  लक्ष्मीची पाऊले अशा घराकडे आपोआप वळतात, आचार्य चाणक्यांनी सांगितलेत 3 उपाय (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या