JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ramadan 2023: शुक्रवार आणि ईदची नमाज घरी अदा करता येते का? काय आहे नियम जाणून घ्या

Ramadan 2023: शुक्रवार आणि ईदची नमाज घरी अदा करता येते का? काय आहे नियम जाणून घ्या

इस्लाममध्ये नमाजाला विशेष महत्त्व आहे. प्रगाढ श्रद्धा असलेले लोक दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. नमाज पठणाचे स्वतःचे नियम आहेत. रमजानच्या विशेष महिन्यात नमाज अदा करण्याच्या पद्धतीविषयी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या तज्ञांकडून जाणून घ्या.

जाहिरात

नमाज पडण्याचे नियम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अलीगढ, 12 एप्रिल : रमजानच्या पवित्र महिन्यात 4 शुक्रवार असतात, त्यामुळे रमजाननंतर ईदचा सण साजरा केला जातो. शुक्रवार आणि ईदची नमाज विशेष मानली जाते. इतरवेळी लोकांना मशिदीत जाता येत नसलं तर ते त्यांच्या घरी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी नमाज अदा करू शकतात. पण, हाच नियम शुक्रवार आणि ईदच्या नमाजलाही लागू होतो का? वास्तविक, इस्लाममध्ये नमाज-ए-जुमामध्ये जो शरी आदेश आहे, तोच शरी आदेश ईद-उल-फित्रच्या नमाजातही आहे. त्यामुळे घरी ईदची नमाज अदा करता येत नाही. नमाज-ए-ईद वाजिब होण्यासाठीची एक अट म्हणजे हुकूमतकडून कोणतेही निर्बंध नसावेत. जर अशी परिस्थिती असेल तर, एखादी व्यक्ती इमामच्या मागे ईद आणि शुक्रवारची नमाज अदा करू शकत नसेल, तर तो शुक्रवारच्या नमाजऐवजी जोहर अदा करू शकतो. पण ती फक्त जोहरची नमाज असेल, जुमा किंवा ईदची नमाज स्वीकारली जाणार नाही.

ईदची नमाज घरी अदा करता येते की नाही? अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या दीनियत विभागाचे माजी अध्यक्ष मुफ्ती जाहिद अली यांनी सांगितले की, शुक्रवार आणि ईदची नमाज घरी अदा करता येत नाही. जुमा आणि ईदची नमाज फक्त जमातसोबतच अदा करता येते. शुक्रवारीही जमात न मिळाल्यास जोहरची नमाज अदा केली जाईल. ईदसाठी जमातसोबत नमाज करणे आणि घराबाहेर पडणे ही अट आहे. हे वाचा -  लक्ष्मी येई घरा! अक्षय्य तृतियेच्या दिवशी या 3 उपायांनी घरात येईल सुख-समृद्धी अली म्हणाले की, ईदच्या दिवशी जमातसोबत नमाज अदा करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. सुरक्षेचा मुद्दा असेल तर ती वेगळी बाब आहे. जर काही कारणास्तव शुक्रवार आणि ईदची नमाज जमाअतसह अदा केली गेली नाही तर त्याला फक्त जोहरची नमाज म्हटले जाईल आणि ईदची नमाज अजिबात अदा केली जाणार नाही. हे वाचा -  गुटर गूं.. करत घरात, खिडकीत कबूतर येण्याचा अर्थ? भविष्यातील कशाचे ते संकेत (सूचना : येथे दिलेली माहिती संबंधित धार्मिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या