धार्मिक मान्यतेनुसार, घरामध्ये कबुतराने घरटे बनवणे अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सुख-शांती भंग पावून घरात गरिबी यायला सरुवात होते.
कबुतराचे घरटे तयार झाल्यामुळे घरात अनेकदा घाण होते आणि घरातील सदस्यांना पैशासाठी तळमळ करावी लागते, असे मानले जाते.
पण धार्मिक विद्वानांच्या मते, कबुतराचे घरटे घरात तयार होणे शुभ नसले तरी कबूतर अधूनमधून घरात-खिडकीत येऊन गुटर गूं करणं शुभ चिन्ह मानलं जातं.
असे म्हटले जाते की, याद्वारे माता लक्ष्मी घरात आपल्या आगमनाचे संकेत पाठवते. सकाळी लवकर कबुतराचे घरी गुटर गूं होणे हे संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार कबूतर धान्य खाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या घरात धनाची वाढ होणार आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि घरात सुख-शांती नांदते.
मात्र, कबुतरांना छतावर खाऊ घालण्याऐवजी बाल्कनी किंवा अंगणात अन्न आणि पाणी ठेवू शकता. असं केल्यानं बुध ग्रह बलवान होतो, असे मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)