JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Ram Navami 2023: रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; श्रीरामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

Ram Navami 2023: रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; श्रीरामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

Ram Navami 2023 Date: रामनवमीला गोस्वामी तुलसीदासांनी रचलेल्या रामचरितमानसच्या काही श्लोकांचा जप केल्यानं माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे म्हणतात. आज आम्‍ही तुम्‍हाला त्या चतुष्‍पदांविषयी सांगणार आहोत, ज्याचा जप केल्‍यानं…

जाहिरात

रामनवमी 2023

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अयोध्या, 29 मार्च : हिंदू धर्मात रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म या पृथ्वीतलावर झाला. यंदा 30 मार्च रोजी रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. रामनवमीला घरोघरी मठ-मंदिरांमध्ये रामचरितमानसाचे पठण केले जाते. प्रभू रामाच्या मंदिरांमध्ये पुजाऱ्यापासून भक्तापर्यंत सर्वजण रामाच्या जयंतीनिमित्त विविध स्तोत्रांचे पाठ करतात. रामनवमीला गोस्वामी तुलसीदासांनी रचलेल्या रामचरितमानसच्या काही श्लोकांचा जप केल्यानं माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे म्हणतात. आज आम्‍ही तुम्‍हाला त्या चतुष्‍पदांविषयी सांगणार आहोत, ज्याचा जप केल्‍यानं संकटातून मुक्ती, रिद्धी-सिद्धी, लक्ष्मीची प्राप्ती आणि संतानप्राप्ती इ.मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अयोध्येचे ज्योतिषाचार्य पंडित कल्की राम म्हणतात की, राम नवमीला रामचरितमानसचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. सनातन हिंदू धर्माचे लोक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी रामनवमीला रामचरित मानसाचे पठण करतात. त्यामुळे रामाचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. 1- इच्छा पूर्ण करण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि अडचणी दूर होण्यासाठी रामनवमीमध्ये या चौपईचा 108 वेळा जप करावा. कवन सो काज कठिन जग माहीं! जो नहिं होइ तात तुम पाहीं!! 2- लक्ष्मीप्राप्तीसाठी जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर रामचरितमानसच्या या वचनाचा जप करा. जिमि सरिता सागर मंहु जाही! जद्यपि ताहि कामना नाहीं!! तिमि सुख संपत्ति बिनहि बोलाएं! धर्मशील पहिं जहि सुभाएं!! 3- मालमत्ता मिळवण्यासाठी जर तुम्हाला पैसा-संपत्ती मिळवायची असेल तर रामचरित मानस या वचनाचा जप करा. जे सकाम नर सुनहि जे गावहि! सुख संपत्ति नान विधि पावहि!! 4- संकटातून मुक्त होण्यासाठी कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही रामचरितमानसच्या या चौपईचा जप करू शकता. दीन दयालु विरद संभारी! हरहु नाथ मम संकट भारी! 5- चांगले गुण मिळवण्यासाठी जर तुम्हाला तुमच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर रामचरित मानसच्या या चौपाईचा जप करा. जेहि पर कृपा करहि जनु जा‍नी! कवि उर अजिर नचावहि बानी!! मोरि सुधारिहि सो सब भांती! जासु कृपा नहिं कृपा अघाति!!

6- रिद्धी सिद्धी प्राप्तीसाठी - रिद्धी-सिद्ध मिळवायची असेल तर रामचरित मानसच्या या चौपाईचा पाठ करा. साधक नाम जपहिं लय लाएं! होहि सिद्धि अनिमादिक पाएं!! 7- घरगुती वाद-त्रास घरात सतत घरगुती वाद-अडचणी असतील तर, देवी लक्ष्मी घरात कधीही वास करत नाही. घरगुती त्रास दूर करण्यासाठी रामचरित मानसच्या या चौपाईचा जप करा. हरन कठिन कलि कलुष कलेसू! महामोह निसि दलन दिनेसू!! 8- विवाहाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचण निर्माण होत असेल तर रामचरित मानसच्या या वचनाचा जप करा. तब जनक पाइ बसिष्‍ठ आयसु ब्‍याह साज संवारि कै! मांडवी श्रुतकीरति उरमिला कुअंरि लईं हंकारि कै!! रामनवमीशिवाय इतर दिवशीही रामचरितमानसच्या या ओळींचा आपण जप करू शकतो. प्रभु श्रीरामाची, देवी लक्ष्मीची यामुळे आपल्यावर आणि कुटुंबावर कृपा राहते, असे मानले जाते. हे वाचा -  मान-सन्मान-पैसा मिळण्याचे ते संकेत समजा! अशी स्वप्ने पडणाऱ्यांचे पालटते नशीब (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या